मार्टिना हिंगिसच्या बरोबरीने मिळवलेले विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद कारकीर्दीतील संस्मरणीय जेतेपदांपैकी एक आहे, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने व्यक्त केले. ४२ वर्षीय पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना अलेक्झांडर पेया आणि तामेआ बाबोस जोडीला नमवत मिश्र दुहेरीच्या जेतेपदाची कमाई केली. पेसचे हे कारकीर्दीतील १६ वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
‘‘कोणते ग्रँड स्लॅम सगळ्यात आवडते, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मात्र मार्टिनाच्या बरोबरीने मिळवलेले जेतेपद चिरंतन स्मरणात राहणारे असेल. विम्बल्डनसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्पर्धेत एकही सेट न गमावता जेतेपद ंपटकावणे विशेष आहे,’’ असे पेसने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘मार्टिना हिंगिस आणि मार्टिना नवरातिलोव्हा या टेनिस दिग्गजांच्या बरोबरीने प्रदीर्घ काळ टेनिससारखा खेळ खेळता येणे माझे भाग्य आहे.
हिंगिस आणि नवरातिलोव्हा महान खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर खेळताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. चांगल्या खेळाडूप्रमाणे चांगले व्यक्तिमत्त्व असल्याने या दोघींचा मी आदर करतो.’’
‘कारकीर्दीतील संस्मरणीय जेतेपद’
मार्टिना हिंगिसच्या बरोबरीने मिळवलेले विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद कारकीर्दीतील संस्मरणीय जेतेपदांपैकी एक आहे,
First published on: 14-07-2015 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Among my most special wins says leander paes