भारताच्या अमृतप्रित सिंग याने आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरीत वाटचाल केली. त्याने ९१ किलो गटात जॉर्डनच्या युसूफ अल नुबानी याच्यावर १६-९ अशी मात केली.
गतवर्षी अग्लोरोव्ह चषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या अभिषेक बेनीवल याने ८१ किलो गटात उपांत्य फेरी गाठली. त्याला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली. युवा विश्वचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता नरिंदर बेरवाल (९१ किलोवरील) याने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याने श्रीलंकेच्या रोशन हेतिराचिची याला पराभूत केले. त्याला पुढच्या फेरीत कझाकिस्तानच्या दास्तान कुर्मानबेटोव्ह याच्याशी खेळावे लागणार आहे.

Story img Loader