पीटीआय, नवी दिल्ली : महिला कुस्तीगीरांना न्याय मिळवून देण्यासाठी जंतर मंतरवर धरणे आंदोलनाला बसलेल्या कुस्तीगीरांनी शनिवारी आमच्या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दुसऱ्यांदा धरणे आंदोलनाला सुरुवात केल्यावर कुस्तीगीरांनी राजकीय पक्षांनी पुढे यावे असे आवाहन केले होते. मात्र, आता कुस्तीगीर काही लोक आमच्या आंदोलनाला वेगळय़ा दिशेने घेऊन जाण्याच्या हेतूने आमच्याबरोबर आले आहेत, असे सांगितले. पण, त्यांनी कोण हे स्पष्ट केले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘आमच्या आंदोलनाचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ देणार नाही. आम्ही आंदोलन वेगळय़ा दिशेने जाऊ देणार नाही. हा लढत केवळ महिला कुस्तीगीरांचा नाही, तर भारताच्या मुलींच्या न्यायासाठीचा आहे,’’ असे बजरंगने सांगितले. मात्र, असे कोण करत आहे असा प्रश्न केल्यावर बजरंगने काहीच उत्तर दिले नाही. आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी वडेरा, भूपिंदर सिंह हुडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक, दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी सिंग, सुर्बाह भारद्वाज अशा मोठय़ा नेत्यांनी जंतर मंतरवर आंदोलक कुस्तीगीरांची बैठक घेतली आहे. यातील काहींना विनेशने प्रसारमाध्यमांसमोरही आणले होते.

‘‘आमच्यासाठी सर्वच जण आदरास पात्र आहेत. यात संवैधानिक पदे भूषविणाऱ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सर्वच जण येतात. आम्ही प्रत्येकाचा आदर करतो. आम्ही कुणाच्याही विरोधात बोलणार नाही. आमचा लढा हा न्यायासाठी आहे. त्याचा राजकीय वापर होत असेल, तर आम्हाला ते आवडणार नाही,’’ असे विनेशने सांगितले. पण, कोण वेगळे वळण देत आहे याबाबत बजरंगप्रमाणे विनेशही काहीच बोलला नाही. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी आंदोलक कुस्तीगीर आमचा तपास यंत्रणेवर विश्वास नाही असे म्हणत होते. आता गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्यातील मजकुरावर समाधानी आहात का ? असे विचारल्यावर मात्र ते आमच्या वकिलांशी बोला असे सांगत आहेत.

कुस्तीगीरांनी या वेळी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे टाळत असल्याचा ब्रिजबूषण सिंह यांचा आरोप फेटाळून लावला. ‘‘राष्ट्रीय स्पर्धा टाळण्याचा प्रश्नच येत नाही. मी आतापर्यंत फक्त चार राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नाही. अर्थात, यामागे दुखापतीचे कारण होते. हे आंदोलन कोण राष्ट्रीय स्पर्धेत खेळतो किंवा नाही याबाबत नाही, तर लैंगिक छळाबद्दलचे आहे. कोणताही खेळाडू हा देशापेक्षा मोठा नसतो,’’ असे बजरंग म्हणाला.

दिल्ली पोलिसांकडून आमचा छळ होत आहे. रात्री आमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आम्हाला अन्न, पाणी, गाद्या, लाकडी खाट आणू दिले नाही. आंदोलनस्थळी वस्तू घेऊन आलेल्या कामगारांपैकी एकही घरी पोचलेला नाही. हा छळ नाही, तर काय आहे. 

– बजरंग पुनिया