Harbhajan Singh who is angry with MS Dhoni’s fans is getting trolled: टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याचे श्रेय कोणाला द्यायचे? हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०११ चा भाग असलेला गौतम गंभीर अनेक प्रसंगी प्रश्न उपस्थित करत आहे. गंभीरच्या मते, भारताने एकट्या धोनीमुळे नाही तर संपूर्ण संघाने विश्वचषक जिंकला होता. आता टीम इंडियाचा माजी स्टार स्पिनर हरभजन सिंगनेही या वादात उडी घेतली आहे. भज्जीचे एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्याने एमएस धोनीच्या फॅनवर ताशेरे ओढताना एक मोठी गोष्ट सांगितली होती. मात्र, यानंतर भज्जी त्याच्या एका जुन्या ट्विटमुळे ट्रोल झाला.

धोनीने कर्णधार झाल्यानंतर ४८ दिवसांत विश्वचषक जिंकला –

टीम इंडियाच्या पराभवानंतर एका चाहत्याने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करणारे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “कोच नाही, कोणता स्टाफ नाही, वरिष्ठ खेळाडूंनी सहभागी होण्यास नकार दिला..यापूर्वी कधीही एकाही सामन्यात कर्णधार नाही, या व्यक्तीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि कर्णधार झाल्यानंतर ४८ दिवसांत टी-२० विश्वचषक जिंकला.”

आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो –

या ट्विटला हरभजन सिंगने उत्तर दिले, “होय जेव्हा हे सामने खेळले गेले तेव्हा हा तरुण देशासाठी एकटाच खेळला.. बाकीचे १० खेळले नाहीत.. म्हणूनच त्याने एकट्याने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली.. गंमत म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्याही देशाने विश्वचषक जिंकला की ऑस्ट्रेलिया किंवा या देशाने विजेतेपद पटकावले अशी चर्चा होते, पण भारत जिंकला की कर्णधार जिंकला असे म्हणतात..हा एक सांघिक खेळ आहे..आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो.”

हेही वाचा – IND vs AUS: ‘तो एकटा खेळला बाकी १०…’; एमएस धोनीचे कौतुक करणाऱ्या चाहत्याला हरभजन सिंगने सुनावले

दुसऱ्या चाहत्याने हरभजनला जुन्या ट्विटची आठवण करुन दिली –

पण दुसऱ्या चाहत्याने भज्जीला त्याच्या जुन्या ट्विटची आठवण करुन देत ट्रोल केले. चाहत्यांनी भज्जीला सुमारे सात वर्ष जुन्या ट्विटची आठवण करून दिली, ज्यामध्ये हरभजनने लिहिले होते, “भारताला कसोटीत नंबर-१ बनवल्याबद्दल लीडर ‘विराट कोहली’चे अभिनंदन. आता त्याने २०१९ च्या विश्वचषकावर लक्ष ठेवले पाहिजे.”

Story img Loader