इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारतानं ३-१ असा मालिका विजय साजरा केला तेव्हा महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट केलं होतं. कसोटी मालिकेमध्ये २७ बळी घेणारा भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलनं घातलेला गॉगल आनंद महिंद्रा यांना आवडला होता. त्यांनी ट्वीटवरून तसाच गॉगल घेण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. आता आनंद महिंद्रांनी खरंच तसा गॉगल त्यांच्यासाठी मागवला आहे! एवढंच नाही, तर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली टी-२० मालिका ते हाच गॉगल लावून पाहात आहेत! ट्वीट करून त्यांनी याबद्दल सगळ्यांना सांगितलं असून त्यावर त्यांच्या पत्नी त्यांना काय म्हणाल्या, ते देखील त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.
I said I was going to get myself a pair of ‘Axar’s shades’ to commemorate the series win. Bought a pair (thanks Sporting Tool Relish!) & all set to watch the match tonight. I know, I know; no shades needed to watch TV & wife thinks I’m crazy but maybe it’ll be a good luck charm! pic.twitter.com/SKkE9z3D4N
— anand mahindra (@anandmahindra) March 14, 2021
नेमका काय आहे हा किस्सा?
कसोटी मालिकेमध्ये भारतानं इंग्लंडला ३-१ असं नमवत मालिका जिंकली. या मालिकमध्ये अक्षर पटेलनं फक्त ३ सामने खेळत २७ बळी घेतले. चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये अक्षर पटेलनं एकूण ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे खुश झालेल्या आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून अक्षर पटेल आणि त्याच्या गॉगलचं कौतुक देखील केलं होतं. “ओके. मालिका विजय आपण खिशात घातला. आता आपला विजय साजरा करण्यासाठी मला ते (अक्षर पटेलचे) सनग्लासेस हवे आहेत. ते कोणत्या ब्रँडचे आहेत आणि मला कुठे मिळतील?” असं आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
Ok. Done & dusted. Series win in the pocket.