Anand Mahindra Post IND vs AUS: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०२३ च्या विश्वचषक फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी अनेक ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अगदी ज्यांना तिकीट काढून अहमदाबादमध्ये जाणे शक्य झाले नाही त्यांनी घरोघरी मित्रांच्या बरोबर, काही ठिकाणी मोठमोठ्या मैदानात प्रोजेक्टर आणि मोठी स्क्रीन लावून सामन्याचा आनंद घेण्याचा बंदोबस्त केला आहे. पण प्रसिद्ध बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी आपण सामना अजिबात बघणार नसून उलट स्वतःला खोलीत कोंडून घेणार असल्याचे सांगितले आहे.

भारतीय व त्यांचा विश्वास विशेषतः क्रिकेटच्या बाबत अतुलनीय आहे. अगदी काही जण लघुशंकेला जाणं सुद्धा टाळतात. स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या वेळी मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हाच भारत जिंकतो अशी पोस्ट केली होती. अशाच काहीशा समजुतीने आनंद महिंद्रा यांनी सुद्धा खास पोस्ट केली आहे. महिंद्रा लिहितात की, “मी फक्त भारताची जर्सी ज्यावर स्वतःचे नाव लिहिले आहे ती घालून स्वतःला एका खोलीत कोंडून घेणार आहे, मी सामना बघणार नाही. तेव्हाच दार उघडेन जेव्हा कोणीतरी दार ठोठावून सांगेल की, “आपण जिंकलो”, हीच माझी देश सेवा असेल.”

आनंद महिंद्रा पोस्ट

हे ही वाचा<< “एवढ्या चाहत्यांना शांत करण्यात..”, IND vs AUS सामन्याची स्थिती पाहता पॅट कमिन्सचं ‘ते’ बोचणारं विधान चर्चेत

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्याचे आतापर्यंतचे अपडेट्स पाहता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ रोहित शर्माच्या मेन इन ब्लुपेक्षा शक्तिशाली सिद्ध होत आहे. नाणेफेकीत जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामीवीरांनी अगदी स्वस्तात बाद केल्यावर के. एल. राहुल व विराट कोहलीला सुद्धा त्यांनी अर्धशतक करून माघारी धाडले. पहिल्या डावाच्या शेवटी भारतीय संघाने २४० धावा पूर्ण करून ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे तुलनेने सोपे आव्हान दिले आहे.

Story img Loader