सिंगापूर ओपन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने चीनच्या वांग झि यी चा पराभव करत विजय मिळवला आहे. या कामगिरीनंतर सिंधू सुपर ५०० विजेतेपद तिने पटकावले आहे. सिंधूने पहिल्यांदाच सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावल आहे. सिंधूच्या या कामगिरीचे सगळीकडून कौतुक होत आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही सिंधूचा खास फोटो ट्वीट करत तिचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- रविवार विशेष : विश्रांती.. पोषक की बाधक?

‘किती छान फोटो आहे. हे फक्त तिच्या चेहऱ्याचे भाव नाही तर तिच्या आत्म्याचे भाव आहे. कधीही हार मानू नकोस, पडत्या काळात निराश न होता पुन्हा वर कसे उठायचे आम्हाला शिकवत रहा’, असा संदेश महिंद्रा यांनी फोटोसोबत दिला आहे.

हेही वाचा- भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणेची गरज!; आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचे विजयाचे लक्ष्य

सिंगापूर ओपन २०२२ च्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूनं अप्रतिम खेळी साकारली आहे. तिने पहिल्याच सेटमध्ये सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण दुसऱ्या सेटमध्ये चिनच्या वांग झी यीने कडवी झुंज दिली. परंतु अंतिम सेटमध्ये सिंधून चांगल्याप्रकारे पुनरागमन करत सिंगापूर ओपन स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. त्याअगोदर, सिंधूने उपांत्य पूर्व फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ सेटमध्ये जिंकला. यावर्षी सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० पदकं जिंकली आहेत. त्यानंतर सिंगापूर ओपनचं तिसरं पदकही तिने आपल्या नावावर केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिंधूचं कौतुक केलं आहे. “पी व्ही सिंधूने भारतासाठी चांगली बातमी दिली आहे. तिने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. सिंगापूर ओपनचं पदक जिंकल्याबद्दल पी व्ही सिंधू तुझं खूप अभिनंदन. तू करोडो लोकांसाठी प्रेरणा आहेस.” असं ट्वीट फडणवीसांनी केलं आहे.