Andre russell hit six against haris rauf in MLC 2024 : टी-२० विश्वचषक २०२४ च्या समाप्तीसह, लीग क्रिकेट पुन्हा एकदा सुरू झाले आहे, ज्यामध्ये मेजर क्रिकेट लीग चा दुसरा हंगाम अमेरिकेत खेळला जात आहे. यामध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स यांच्यात डॅलसच्या स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हरिस रौफच्या षटकात आंद्रे रसेलच्या बॅटमधून एक शॉट दिसला, ज्याने प्रत्येक क्रिकेटरला नक्कीच आश्चर्यचकित केले. रसेलची गणना जागतिक क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आंद्रे रसेलला टी-२० फॉरमॅटमध्ये डेथ ओव्हर्समध्ये त्याच्याकडे गोलंदाजी करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे काम नाही. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाकडून खेळत असलेल्या पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफच्या चेंडूवर रसेलने १०७ मीटर लांब षटकार ठोकला, तेव्हा या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले, ज्याची उंची निश्चितच सर्वांना थक्क करून गेली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

रसेलने ३५१ फूट उंचीवर चेंडू मारला –

लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९ षटकापर्यंत ६ गडी गमावून १५० धावा केल्या होता. त्यानंतर शेटचे षटक टाकण्याची जबाबदारी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाने हरिस रौफ दिली होती. त्याने या षटकातील पहिल्या २ चेंडूंवर एकही धाव न दिली नाही. यानंतर, रौफने तिसरा चेंडू थोडा वरच्या दिशेने टाकला, ज्यावर रसेलने पूर्ण ताकदीनिशी शॉट मारला आणि चेंडू हवेत खूप उंच गेल्यानंतर वाइड लाँग ऑनच्या दिशेने गेला. या षटकाराची लांबी १०७ मीटर, तर उंची ३५१ फूट होती. जी क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च असू शकते. यापूर्वी, गेल्या वर्षी जेव्हा एमएलसीचा पहिला हंगाम खेळला गेला , तेव्हा रसेलने हरिस रौफच्या चेंडूवर १०८ मीटर लांब षटकार मारला होता.

हेही वाचा – गौतम गंभीरची कोच म्हणून घोषणा करण्यास BCCIला का होतोय विलंब? काय आहे नेमकं कारण?

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाने जिंकला सामना –

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. यानंतर सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाने या लक्ष्याचा पाठलाग अवघ्या १५.२ षटकांत ४ गडी गमावून केला, ज्यामध्ये फिन ऍलनने ६३ आणि मॅथ्यू शॉर्टने ५८ धावांचे योगदान दिले. आता पॉइंट टेबलमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न २ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर नाइट रायडर्स दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.

Story img Loader