कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत जमैका संघाकडून खेळणाऱ्या आंद्रे रसेलला अखेरीस सूर गवसला आहे. बार्बाडोस संघाविरुद्ध खेळत असताना रसेलने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत २८ चेंडूत ५४ धावा केल्या. रसेलच्या अर्धशतकी खेळामुळे जमैकाने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या. मात्र या सामन्यात आंद्रे रसेलला नशिबाचीही भरपूर साथ मिळाली.
अवश्य वाचा – Video : इंग्लंडच्या खेळाडूंचं हास्यास्पद वर्तन, चेंडू बॅटला लागूनही LBW साठी घेतला DRS
१७ व्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेल मोठा फटका खेळण्यास चुकला आणि चेंडू स्टम्पला लागला. परंतू बेल हवेत उडून पुन्हा स्टम्पवर पडल्यामुळे रसेलला जीवदान मिळालं. यानंतर रसेल आणि राशिद खान यांच्यात मैदानात गमतीशीर द्वंद्व रंगलेलं पहायला मिळालं.
THE LIGHTS ARE ON…. Dre Russ has a lucky escape. #CPL20 #JTvBT #CricketPlayedLouder pic.twitter.com/EcQ1TM8eog
— CPL T20 (@CPL) September 5, 2020
आंद्रे रसेलचं फॉर्मात येणं हे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आश्वासक मानलं जातंय. रसेल हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. १९ सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स आपला पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळतील.
अवश्य वाचा – एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक