वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावेळेस आंद्रेने अगदी निवडक खेळाडूंच्या नावे असणारा विक्रम करून दाखवला आहे. 6IXTY स्पर्धेत सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स विरुद्ध एकाच षटकात सलग ६ षटकार मारून आंद्रे रसेल हा विक्रम करणाऱ्या अगदी मोजक्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळत असताना त्याने २४ चेंडूत ७२ धावांची अफलातून खेळी करत संघाला ३ धावांनी विजय मिळवून दिला. या तुफान षटकारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सच्या गोलंदाजांची दमछाक करून आंद्रे रसेल या सामन्यात खेळताना दिसला. अनेकदा शांत आणि संयमी दिसणारा रसेल त्याच्या बेस्ट फॉर्ममध्ये आक्रमक होत होता. (हेही वाचा – Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…)

आंद्रे रसेल ६ चेंडू ६ षटकार

दरम्यान, आंद्रे रसेल राष्ट्रीय खेळ सोडून आता लीग खेळण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. आयसीसी टी -20 विश्वचषक काही दिवसावर येऊन ठेपले असताना वेस्ट इंडिज क्रिकेट संघात काही अंतर्गत वाद असल्याची चिन्हे आहेत. अनेक खेळाडूंनी अनुपलब्ध असल्याचे सांगितले असे समजतेय. अशात टी -20 विश्वचषकात निवड फेरी खेळण्यासाठी वेस्ट इंडिजची तयारी फार मजबूत नसणार हीच चिन्हे आहेत.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासह झालेल्या वादानंतर आंद्रे रसेल आयसीसी T20 विश्वचषक २०२१ पासून एकही सामना खेळलेला नाही. अलीकडेच, तो द हंड्रेड स्पर्धेत खेळताना दिसला. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडे क्वालिफायर खेळण्यापूर्वी फक्त दोनच T20 सामने शिल्लक आहेत.अशावेळी वेस्ट इंडिजला प्लेइंग 11 मध्ये रसेलसारख्या अनुभवी खेळाडूची गरज आहे मात्र त्याला स्थान दिल्यास पुन्हा पेच निर्माण होऊ शकतील परिणामी प्रशिक्षक निकोलस पूरनस्पर्धेपूर्वी नमते घेतील असे दिसत नाही.

Story img Loader