Andrew Flintoff’s Emotional Revelation on His Accident: इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफ बराच काळ मीडिया आणि लोकांच्या नजरेपासून दूर आहे. २०२२ मध्ये बीबीसीच्या टॉप गियर या टीव्ही शोदरम्यान फ्लिंटॉफचा कार अपघात झाला ज्याचा त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. या घटनेमुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली ज्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती. फ्लिंटॉफने त्याची वेदनादायक कहाणी सांगितली आणि सांगितले की तो सध्या मानसिकदृष्ट्या खूप संघर्ष करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Vinesh Phogat Coach: “त्या रात्री तिचा जीव गेला असता…” विनेश फोगटच्या कोचने अंतिम फेरीपूर्वी वजन कमी करतानाचा सांगितला प्रसंग

अँड्र्यू फ्लिंटॉफने सांगितली अपघातानंतरची ह्रदयद्रावक कहाणी

फ्रेडी फ्लिंटॉफच्या फील्ड ऑफ ड्रीम्स ऑन टूर नावाच्या मालिकेत, फ्लिंटॉफने दुखापतीनंतरच्या अनुभवाबद्दल खुलासा केला, ज्याने हे उघड केले की तो मदत मागण्यासाठी धडपडत आहे. ड्रीम्स टूर सीरिजच्या फ्रेडी फ्लिंटॉफ फील्डमध्ये तो म्हणाला, ‘माझ्यासोबत जे घडले त्यानंतर कदाचित मी इथे नाही यायला पाहिजे होतं. पण मला बसून स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाहीय. मला कोणाची सहानुभूती नको आहे. मी अनेक समस्यांशी झुंज देत आहे, मला भयानक स्वप्नं पडत आहेत, मला जुन्या गोष्टी आठवतात. याचा सामना करणे खूप कठीण आहे. पण मला वाटले की मी आता काही करू शकलो नाही तर पुन्हा मी कधीही करू शकणार नाही. मला याबरोबरच पुढे जावे लागेल. मी आधीच संघर्ष करत आहे. मला मदत हवी आहे पण मी कोणाकडे मदत मागू शकत नाहीय. मला दर दोन मिनिटांनी रडावसं वाटतं.

हेही वाचा – Lakshya Sen: “प्रकाश पदुकोण सरांनी पॅरिसमध्ये माझा फोन काढून घेतला…”, लक्ष्य सेनने पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार? पाहा VIDEO

फ्लिंटॉफ पुढे म्हणाला, ‘मला सकारात्मक बाजू बघायला हवी. मला आणखी एक संधी मिळाली आहे आणि मला आता त्यासाठी जगायचे आहे. मी याकडे दुसरी संधी म्हणून पाहतो. तुम्ही अशी काही मुलं बघता ज्यांना आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. यातूनच मला प्रेरणा मिळाली. या सर्वांनी आपल्या जीवनात अडचणींचा सामना केला आहे. “हे खूपच विचित्र आहे, मी बोलताहीना खूप भावूक होत आहे…मला माझा चष्मा लावावा लागेल.”

हेही वाचा – WI vs SA Test: पहिल्याच दिवशी दाणादाण; १३ वर्षांनी गयानात टेस्ट आणि दिवसभरात १७ विकेट्स

फ्लिंटॉफने या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या कसोटी दौऱ्यासाठी इंग्लंडच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसारित झालेल्या नवीन फुटेजमध्ये, फ्लिंटॉफने हे देखील उघड केले की तो झुंज देत असलेल्या नैराश्यामुळे दौऱ्यासाठी भारतात जायचे की नाही यावर विचार करत होता, ज्यामुळे त्याला घरातून बाहेर पडणं कठीण वाटत होतं. फ्लिंटॉफ सध्या द हंड्रेडमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्ससह त्याच्या पहिल्या पूर्ण-वेळ प्रशिक्षण पदावर कार्यरत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andrew flintoff emotional revelation on car accident opens up anxiety nightmares about his horrific crash while filming top gear in 2022 bdg