विम्बल्डन चषकाला गवसणी घालणारा ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेने प्रशिक्षक इव्हान लेंडल यांच्यापासून फारकत घेतली आहे. दोघांनीही परस्पर सामंजस्याने दोन वर्षांपासूनचा करार संपुष्टात आणला आहे. काडीमोड होण्यामागे इव्हान लेंडल यांनीच आपल्याला भडकवल्याचे मरेने म्हटले आहे. डिसेंबर २०११मध्ये प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर मरेने लेंडल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक सुवर्णपदक, अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आणि विम्बल्डन चषकावर नाव कोरले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andy murray and coach ivan lendl split after two year tennis partnership