जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचविरुद्धची आठ पराभवांची मालिका खंडित करत अँडी मरेने रॉजर्स चषक जेतेपदावर नाव कोरले. कारकीर्दीतील मरेचे हे ३५वे जेतेपद आहे. २०१३ विम्बल्डन स्पर्धेतील विजयानंतर पहिल्यांदाच मरेने जोकोव्हिचला नमवण्याची किमया केली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर मरेसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. या लढतीत मरेने जोकोव्हिचवर ६-४, ४-६, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला. अँडी मरेने हा विजय प्रशिक्षक अ‍ॅमेली मॉरेस्मो यांना समर्पित केला. मॉरेस्मो यांनी नुकताच बाळाला जन्म दिला.

Story img Loader