आपल्याच भूमीवर खेळल्या जाणाऱ्या टेनिस जगताच्या सर्वात मोठय़ा स्पर्धेतील ब्रिटनचा ‘वनवास’ तब्बल ७७ वर्षांनंतर रविवारी संपुष्टात आला. सर्वात प्रतिष्ठेच्या विम्बल्डन विजेतेपदावर आपले नाव कोरत इंग्लिश खेळाडू अँडी मरेने हिरवळीवर पुन्हा ‘ब्रिटिशराज’ स्थापन केले. जबरदस्त टेनिस कौशल्य, कोर्टवरचा सर्वागसुंदर वावर आणि घरच्या प्रेक्षकांच्या अफाट पाठिंब्याच्या जोरावर मरेने सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचे तगडे आव्हान ६-४, ७-५, ६-४ असे मोडून काढत हा इतिहास घडवला. प्रचंड उष्ण वातावरणाची तमा न करता ३ तास आणि १० मिनिटांत मरेने हे स्वप्न साकारले.     

Story img Loader