अँडी मरेने फिलीप कोहलश्रायबरला नमवत म्युनिच टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. क्ले कोर्टवरील स्पर्धेचे मरेचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद आहे. जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी आणि अव्वल मानांकित मरेने फिलीपवर ७-६ (७-४), ५-७, ७-६ (७-४) असा विजय मिळवला. मरेच्या कारकीर्दीतील हे ३२वे जेतेपद आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर क्ले कोर्टवरील स्पर्धेचे जेतेपद मरेचा आत्मविश्वास उंचावणारे आहे. १९७६ नंतर एटीपी क्ले कोर्ट स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मरे हा पहिला ब्रिटिश खेळाडू ठरला आहे. १९७६ मध्ये ख्रिस्तोफर मोटरामने क्ले कोर्ट स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. ‘‘हा खडतर सामना होता. फिलिपची सव्‍‌र्हिस अचूक आणि भेदक होती. मात्र मी चिवटपणे खेळ करत बाजी मारली,’’ असे मरेने सांगितले.

Story img Loader