ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने दुखापतीमुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेला अँडी मरे पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. अँडी मरे याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ग्रँड स्लॅम स्पर्धांमधील एक असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अँडी मरे आता थेट विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.
स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णयानंतर अँडी मरे म्हणाला की, “मला पॅरिसमध्ये खेळायला आवडते, पण न खेळण्याचा निर्णय मला घ्यावा लागत आहे. वैद्यकीय चाचणीनंतर मी पुर्णपणे तंदुरूस्त नसल्याचे सिद्ध झाले. मी लवकरात लवकर कोर्टवर पुन्हा परतण्याचा प्रयत्न करेन”
गेल्या आठवड्यात स्पेनचा टेनिसपटू मर्केल विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळत असताना अँडी मरेला झालेली दुखापत आणखी बळावली होती. त्यामुळे त्याला यावेळच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेला मुकावे लागणार आहे. 

Story img Loader