गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडी मैदानात रंगलेल्या नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत परळच्या हर्क्युलस जिमच्या अनिल बिलावा याने किताबावर नाव कोरले.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आाणि फिटनेस संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल १९५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तर वेळेचे पालन न करणाऱ्या २० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंना सहभाग नाकारण्यात आला. प्रत्येक गटात ४-५ चांगले खेळाडू असल्यामुळे विजेता निवडण्यासाठी परीक्षकांना मेहनत घ्यावी लागली. ५५ आणि ६० किलो वजनी गटात अनुक्रमेोॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारी आणि विपुल सावंत यांनी बाजी मारली. किताबासाठी हेमंत, विपुल, रुपेश चव्हाण, मकरंद दहिबावकर, अनिल बिलावा, राजेश खाटीकमोट आणि विकास म्हापसेकर यांच्यात चुरस रंगली. पण ७५ किलो वजनी गटाच्या विजेता अनिल बिलावाने जेतेपदावर नाव कोरले.

सर्वोत्तम पोझर : महमद हुसेन खान

नवोदित मुंबई श्री : अनिल बिलावा

‘नवोदित मुंबई श्री’चा निकाल

५५ किलो : १. हेमंत भंडारी, २. नितेश कोळेकर, ३. संजय आंग्रे

६० किलो : १. विपुल सावंत, २. महेश कांबळे, ३. सुमित यादव

६५ किलो : १. रूपेश चव्हाण, २. अभिषेक पाटील, ३. सलीम शेख

७० किलो : १. मकरंद दहिबावकर, २. शेख कादर बादशाह, ३. सुनील गुरव

७५ किलो : १. अनिल बिलावा, २. महमद हुसेन खान, ३. हेमंत कंचावडे

८० किलो : १. राजेश खाटिकमोट, २. शब्बीर शेख, ३. पवन सोमई

८० किलोवरील : १. विकास म्हापसेकर, २. प्रतिक यादव, ३. अभिषेक माशेकर

Story img Loader