भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जम्बो या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेने आंध्र प्रदेशात क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. कुंबळेने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांची सोमवारी शिबिराच्या कार्यालयात भेट घेतली आणि राज्यातील खेळाच्या विकासासह अनेक विषयांवर चर्चा केली.

एका डावात १० बळी घेण्याचा विक्रम असलेल्या कुंबळेने राज्यात क्रीडा विद्यापीठासाठी पाठिंबा दर्शवला. स्टार लेगस्पिनरने राज्य सरकारला आंध्र प्रदेशात क्रीडा वस्तू उत्पादनासाठी युनिट सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

 

हेही वाचा – IPLचं मेगा ऑक्शन ‘या’ महिन्यात होणार, दोन नवीन संघ येणार

मेरठ आणि जालंधरमधील स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चरिंग रिंग हबचा संदर्भ देताना कुंबळे म्हणाला, ”अशा प्रकारच्या सुविधांना येथे प्रोत्साहन मिळाले, तर राज्य व क्रीडा क्षेत्राला फायदा होईल.”

कुंबळेची कारकीर्द

५० वर्षीय कुंबळेची गणना जगातील दिग्गज फिरकीपटूंमध्ये केली जाते. कसोटीत त्याने ६१९ आणि एकदिवसीय सामन्यात ३३७ बळी घेतले आहेत. त्याने कसोटी कारकीर्दीत एका डावांमध्ये ५ बळी घेण्याचा पराक्रम ३५ वेळा केला.

Story img Loader