भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदाचा राजीनामा दिला. जानेवारी २०१३ पासून कुंबळे मुंबई इंडियन्ससोबत आहे. क्रिकेट संदर्भातील अनेक बाबींना पुरेसा वेळ देण्यासाठी त्याने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
कुंबळे म्हणाला की, ‘‘मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास समाधानकारक व अभूतपूर्व होता. या तीन वर्षांत दोन वेळा संघाने आयपीएलचे व एकदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले. या संघासोबत काम करताना आनंद आला. त्या सर्वाचे आभार.’’
‘‘अनिल कुंबळे यांचे मुंबई इंडियन्स आभार मानू इच्छितो. कुंबळे यांच्या मार्गदर्शकाच्या पहिल्याच वर्षांत म्हणजे २०१३ मध्ये मुंबईने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग स्पध्रेचे जेतेपद पटकावले. तसेच २०१५ मध्ये संघाने आयपीएलचे जेतेपद पुन्हा जिंकले,’’ असे मत इंडियन्सने प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.

Story img Loader