आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता शहरात पार पडला. त्याआधी Player Transfer Window अंतर्गत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपला कर्णधार रविचंद्रन आश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघात दिलं. नवीन हंगामाच्या लिलावानंतर अपेक्षेप्रमाणे लोकेश राहुलकडे पंजाबच्या संघाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राहुलकडे संघाचं नेतृत्व का सोपवण्यात आलं याचं कारण सांगितलं आहे.

“आम्हाला राहुलच्या अंगावर जबाबदारी द्यायची होती. त्याने जबाबदारी घेण्याची हीच योग्य वेळ होती आणि आम्हाला एका भारतीय कर्णधाराभोवती संपूर्ण संघ मजबूत तयार करायचा होता, त्यामुळे राहुलशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्याची निवड करण्यात आली”, अनिल कुंबळेने कारण सांगितलं.

राहुल गुणी खेळाडू आहे यात काहीच वाद नाही. त्याची फलंदाजी आणि यष्टीरक्षणातालं कौशल्या यामुळे संघासाठी तो महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या शब्दाला संघात महत्व आहे, इतर खेळाडूंसाठी तो रोल मॉडेल ठरु शकतो. मागच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा तो सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू होता. त्यामुळे इतर खेळाडूंची मदत आणि आम्हा प्रशिक्षकांचं मार्गदर्शन या जोरावर राहुल चांगली कामगिरी करेल, कुंबळे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

तेराव्या हंगामाच्या लिलावानंतर असा असेल पंजाबचा संपूर्ण संघ –

फलंदाज – ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, करुण नायर, सरफराज खान, मनदीप सिंग

गोलंदाज – शेल्डन कॉट्रेल (८.५० कोटी), इशान पोरेल (२० लाख), रवी बिश्नोई (२ कोटी), मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्षदीप सिंग, हार्डस विलजोन, एम. अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे

अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल (१०.७५ कोटी), जिमी निशम (५० लाख), ख्रिस जॉर्डन (३ कोटी), तरजींदर ढिल्लन (२० लाख), कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा (५० लाख)

यष्टीरक्षक – लोकेश राहुल, निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंग (५५ लाख)