Pat Cummins Second Most Expensive Player In IPL 2024 : वनडे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल २०२४ च्या लिलावात दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्या कर्णधार कौशल्यासाठी आयपीएल लिलावात इतकी मोठी रक्कम मिळाली, असा विश्वास भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केला. सनरायझर्स हैदराबादने कमिन्सला २०.५ कोटी रुपयांना विकत घेतले. सनरायझर्स हैदराबादशिवाय मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनीही कमिन्ससाठी बोली लावली होती. त्यामुळे बोली इतकी वर पोहोचली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल कुंबळे म्हणाले, ‘ही खरोखरच खूप जास्त किंमत आहे. २० कोटींच्या पुढे बोली अपेक्षित नव्हती. तो चढ्या भावाने विकला जाईल हे आम्हाला माहीत होते, पण त्याने २० कोटी रुपये मिळवून विक्रम केला आहे.’ कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विकला जाणारा खेळाडू ठरला, पण लवकरच त्याला देशबांधव मिचेल स्टार्कने मागे टाकले. आयपीएल लिलावात स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. माजी खेळाडू अनिल कुंबळे पुढे म्हणाले, ‘सनरायझर्स हैदराबाद कदाचित कर्णधाराच्या शोधात आहेत. यामुळेच ते कमिन्सला विकत घेण्यास उत्साही दिसत होते. कदाचित आरसीबीही बऱ्याच दिवसांपासून कर्णधाराच्या शोधात आहेत. पॅट कमिन्सला शुभेच्छा.’

हेही वाचा – IND vs SA 3rd ODI : ‘हे शतक त्याच्या कारकिर्दीसाठी…’, सुनील गावसकरांकडून संजू सॅमसनच्या खेळीचे कौतुक

इयॉन मॉर्गन असे मानतो की कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाच्या अलीकडच्या यशाचे श्रेय कमिन्सलाच जाते. मॉर्गन म्हणाला, ‘पॅट कमिन्सला गेल्या दीड वर्षात मिळालेले यश विलक्षण आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाचे कर्णधारपद सोडण्यासोबतच गोलंदाज म्हणून त्याने इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका राखण्यात मदत केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक वनडे विश्वचषक जिंकू दिला.’

हेही वाचा – IND vs SA :”केशव भाई तुम्ही जेव्हाही मैदानात येता, तेव्हा…”, महाराज-राहुल यांच्यातील मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

मॉर्गन म्हणाला, ‘कमिन्सला त्याचा अलीकडचा फॉर्म आणि आत्मविश्वास लक्षात घेता एवढी मोठी रक्कम मिळाली आहे. हा देखील मागणी आणि पुरवठ्याचा मुद्दा आहे. काही संघ केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर चेंजिंग रूममध्येही नेतृत्वाची भूमिका शोधत आहेत. त्यामुळे पॅट कमिन्स त्याच्या किंमतीला पूर्णपणे न्याय देतो.’ सध्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम आहे. मात्र, गेल्या मोसमात त्याच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. १४ सामन्यांत चार विजय आणि १० पराभवांसह गुणतालिकेत संघ १०व्या स्थानावर राहीला.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble said bidding beyond 20 crores for pat cummins was not expected in ipl 2024 auction vbm