Anil Kumble’s reaction to Ind vs Pak match: भारत येत्या दोन महिन्यांत आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अनेक सामने खेळणार आहे. तत्पुर्वी महान लेगस्पिनर अनिल कुंबळेने मंगळवारी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, या सामन्याला इतर कोणत्याही क्रिकेट सामन्याप्रमाणे घ्यावे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान संघाकडून एकदाही पराभूत झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या माजी कर्णधाराचा पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने १५ कसोटींमध्ये ८१ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात १९९९ मध्ये नवी दिल्ली येथे एका डावात सर्व १० विकेट्स (७४ धावांत १०) घेतल्या होत्या. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५४ विकेट्स घेतल्या आहेत.

‘पिचसाइड’ लाँच कार्यक्रमादरम्यान बोलताना अनिल कुंबळे म्हणाले, “आमच्या काळात म्हणले जात होते कीस केनियाकडून हारा पण पाकिस्तानकडून नाही. त्यामुळे खेळाडूंवर दडपण आणि अपेक्षा दोन्ही जास्त होत्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने असेच खेळले जात आहेत आणि मुख्य म्हणजे तो फक्त इतर सामन्याप्रमाणे घेतला जावा.”

हेही वाचा – IND vs WI 3rd T20: ‘तुला धोनीची सर नाही येणार’; विजयानंतरही हार्दिक पांड्यावर संतापले चाहते, जाणून घ्या कारण

भारताचे माजी फलंदाज आणि सध्याचे एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी, हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सचा पराक्रम हा कुंबळेसाठी अजूनही अविस्मरणीय क्षण आहे. ते म्हणाले, “मी १० विकेट्स घेण्याचा विचार करून मैदानात उतरलो नव्हतो, जरी हे कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न असते.”

भारत आणि पाकिस्तानचे संघ पुढील दोन महिन्यात आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध अनेक सामने खेळणार आहेत. २ सप्टेंबरला आशिया चषक २०२३ मध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. यानंतर ते १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड कप २०२३ मध्ये आमनेसामने असतील. मात्र, हा भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

हेही वाचा – IND vs WI: “मला लाज वाटत नाही, कारण प्रामाणिकपणा…”; विजयानंतर सूर्यकुमार यादवचे मन जिंकणारे विधान

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान संघाकडून एकदाही पराभूत झालेला नाही. दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले असून सातही वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात झाला होता, जिथे भारतीय संघाने पाकिस्तानला एकतर्फी हरवले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble says india should take the match against pakistan like any other match vbm