सज्जन सिंग नेमबाजी स्पर्धा
पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजूम मुदगिल हिने १२व्या सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
कर्नी शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक प्रकारात देशातील १५ आघाडीचे नेमबाज सहभागी झाले आहेत. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या आणि २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठीचे पात्रता निकष पार केलेल्या अंजूमने अंतिम फेरीत २५३.९ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेहूली घोष हिने २५२.४ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. श्रियांका सदानगी हिने २२९.५ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले.
कनिष्ठ महिलांच्या गटात, मेहूलीने २५३.०० गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.