Ankit Bavane Hits Six Fours In One Over: आयपीएल संपली असेल पण चाहत्यांचे मनोरंजन करण्यात भारतीय खेळाडू मागे नाहीत. आयपीएलनंतर चाहत्यांना तामिळनाडू प्रीमियर लीग आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये अनेक रोमांचक आणि अद्भुत क्षण पाहायला मिळत आहेत. सोमवारी लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात कोल्हापूर टस्कर्सने ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यात अंकित बावणेने एकाच षटकात सहा चौकार मारून विक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईगल नाशिक टायटन्स आणि कोल्हापूर टस्कर्स संघातील सामना १०-१० षटकांचा खेळला गेला. या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून ८९ धावा केल्या. यानंतर कोल्हापूर टस्कर्स फलंदाजीसाठी उतरला आणि अंकित बावणेने तुफानी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. बावणेने २७ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावा केल्या. या ११ चौकारांपैकी सहा चौकार एकाच षटकात आले. चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा प्रशांत सोळंकी या वादळाचा बळी ठरला.

अंकित बावणेने एकाच षटकात सहा चौकार मारत रचला इतिहास –

चौथ्या षटकाची जबाबदारी प्रशांत सोलंकीकडे सोपवण्यात आली होती, जे या सामन्यातील त्याचे पहिले षटक होते. अंकिता बावणे स्ट्राईकवर होता, ज्याने एका पाठोपाठ सहा चौकार मारले. संघाने एकाच षटकात २४ धावा केल्या होत्या. त्यामुळे संघाची धावसंख्या १५ वरुम ३९ पर्यंत पोहोचली. त्यामुळे हा सामना जिंकणे त्याच्यासाठी सोपे झाले. त्याचबरोबर आता अंकित बावणे एक इतिहास रचला. तो एमपीएल २०२३ मध्ये एकाच षटकांत सहा चौकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – MS Dhoni: धोनीच्या व्हायरल व्हिडीओमुळे ‘या’ गेम कंपनीला झाला फायदा, तीन तासांत ३६ लाख लोकांनी डाउनलोड केले ॲप

अंकित बावणेने महाराष्ट्र प्रीमियर लीगचे पहिले शतक झळकावले –

बावणेने अवघ्या १० दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिले शतक झळकावले होते. अंकित बावणेने शतक पूर्ण करण्यासाठी ५९ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ४ षटकार ठोकले. हे त्याचे टी-२० मधील पहिले शतक होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankit bavane created history by hitting six consecutive fours in a single over of prashant solanki in mpl 2023 vbm