ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीची ९वी आवृत्ती फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये खेळवली जाईल. यासाठी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्वोतम पहिले आठ संघ पात्र ठरले आहेत. आयसीसीने आपले यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. मात्र, या करारावर अद्याप अधिकृत स्वाक्षरी झालेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातील, असे जरी असले तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाला टीम इंडिया पाकिस्तान सामने खेळायला येणार की नाही अशी भीती वाटत आहे.

आशिया चषकानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. २०२५ मध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आशिया चषक हायब्रीड मॉडेलवर होऊ शकते. त्यावेळी १७ पैकी ४ सामने पाकिस्तान आणि १३ सामने श्रीलंकेत खेळले गेले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असेच काही घडू शकते. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतले जाऊ शकते किंवा ते हायब्रीड मॉडेलवर आयोजित केले जाऊ शकते.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
ICC Asks PCB to Cancels Champions Trophy 2025 Tour in POK After BCCI Objection
Champions Trophy: ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का, POK मधील ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ करंडकाचा दौरा रद्द करण्याचे दिले आदेश
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

क्रिकबझच्या आलेल्या माहितीनुसार, यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. जर पाकिस्तानने यावर आक्षेप नोंदवला तर त्याला आशिया चषक सारख्या हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करावे लागेल. वास्तविक, बीसीसीआय आपला संघ पाकिस्तानला पाठवायला तयार नाही. आशिया चषकातही त्याने अशीच कामगिरी केली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम आहे. अशा परिस्थितीत पीसीबीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा: हार्दिक पंड्याने IPL च्या १० वर्षात केलेली कमाई वाचून व्हाल थक्क! कसा बदलला पंड्याचा पगार, पाहा तक्ता

पीसीबीने करारावर स्वाक्षरी करण्याची शिफारस केली आहे

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची शिफारस केल्याची माहिती समोर येत आहे. जर आयसीसीने याला मंजुरी दिली असेल तर पीसीबीने भारताच्या या मालिकेतील सहभागाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “यावेळीही भारतीय संघाने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आयसीसीने पीसीबीला नुकसान भरपाई द्यावी. भारत जर पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी आला नाही तर आम्ही देखील त्याच्याबरोबर खेळणार नाही,” असे पाकिस्तानने आयसीसीला स्पष्ट शब्दात सांगितल्याचे कळते.

अहमदाबाद येथे आयसीसी कार्यकारी मंडळाची भेट घेतली

पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सलमान नसीर यांनी अहमदाबादमध्ये आयसीसी कार्यकारी मंडळाची या विषयावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. यादरम्यान पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयने जर त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला तर पुढे काय होऊ शकते? या शक्यतेवर चर्चा केली.

हेही वाचा: विश्लेषण : मुंबई इंडियन्सनी हार्दिक पंड्याला पुन्हा मिळवलेच! ‘आयपीएल’मधील ‘ट्रान्स्फर ट्रेड’ ही संकल्पना नक्की काय?

जागतिक संघटनेने स्वतंत्र सुरक्षा एजन्सी नेमावी

पीसीबीने यावेळी सांगितले की, “जर भारताने यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला तर, जागतिक संघटनेने स्वतंत्र सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करावी. भारताव्यतिरिक्त, ही सुरक्षा एजन्सी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर संघांच्या सुरक्षेच्या परिस्थितीचे मूल्यांकन करू शकते.”