ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीची ९वी आवृत्ती फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये खेळवली जाईल. यासाठी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्वोतम पहिले आठ संघ पात्र ठरले आहेत. आयसीसीने आपले यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. मात्र, या करारावर अद्याप अधिकृत स्वाक्षरी झालेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातील, असे जरी असले तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाला टीम इंडिया पाकिस्तान सामने खेळायला येणार की नाही अशी भीती वाटत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आशिया चषकानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. २०२५ मध्ये होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आशिया चषक हायब्रीड मॉडेलवर होऊ शकते. त्यावेळी १७ पैकी ४ सामने पाकिस्तान आणि १३ सामने श्रीलंकेत खेळले गेले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असेच काही घडू शकते. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतले जाऊ शकते किंवा ते हायब्रीड मॉडेलवर आयोजित केले जाऊ शकते.
क्रिकबझच्या आलेल्या माहितीनुसार, यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. जर पाकिस्तानने यावर आक्षेप नोंदवला तर त्याला आशिया चषक सारख्या हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करावे लागेल. वास्तविक, बीसीसीआय आपला संघ पाकिस्तानला पाठवायला तयार नाही. आशिया चषकातही त्याने अशीच कामगिरी केली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम आहे. अशा परिस्थितीत पीसीबीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पीसीबीने करारावर स्वाक्षरी करण्याची शिफारस केली आहे
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची शिफारस केल्याची माहिती समोर येत आहे. जर आयसीसीने याला मंजुरी दिली असेल तर पीसीबीने भारताच्या या मालिकेतील सहभागाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “यावेळीही भारतीय संघाने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आयसीसीने पीसीबीला नुकसान भरपाई द्यावी. भारत जर पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी आला नाही तर आम्ही देखील त्याच्याबरोबर खेळणार नाही,” असे पाकिस्तानने आयसीसीला स्पष्ट शब्दात सांगितल्याचे कळते.
अहमदाबाद येथे आयसीसी कार्यकारी मंडळाची भेट घेतली
पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सलमान नसीर यांनी अहमदाबादमध्ये आयसीसी कार्यकारी मंडळाची या विषयावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. यादरम्यान पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयने जर त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला तर पुढे काय होऊ शकते? या शक्यतेवर चर्चा केली.
जागतिक संघटनेने स्वतंत्र सुरक्षा एजन्सी नेमावी
पीसीबीने यावेळी सांगितले की, “जर भारताने यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला तर, जागतिक संघटनेने स्वतंत्र सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करावी. भारताव्यतिरिक्त, ही सुरक्षा एजन्सी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर संघांच्या सुरक्षेच्या परिस्थितीचे मूल्यांकन करू शकते.”