Harmanpreet Kaur: बांगलादेशात अंपायरच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करणे हरमनप्रीत कौरला महागात पडले. भारतीय महिला क्रिकेट संघावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय आता बीसीसीआयही त्याच्या आक्रमक वागणुकीबद्दल तिच्याशी बोलणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. दोघेही याबाबत हरमनप्रीतशी सविस्तर चर्चा करणार आहेत. मंडळाचे सचिव जय शहा यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.

हरमनप्रीतवर आयसीसीने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. बीसीसीआयला शिक्षेविरोधात अपील करण्याची संधी होती, मात्र बोर्डाने अपील न करण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीतने त्या टाय झालेल्या सामन्यात आऊट झाल्यानंतर केवळ स्टंपच फोडले नाही तर अंपायर्सशी देखील हुज्जत घातली.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलताना येणार असंख्य अडचणी! कसा सामना करणार BCCI?

हरमनप्रीतने चूक मान्य केली

आयसीसीने हरमनप्रीतला दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोषी ठरवले आणि तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. आयसीसीच्या आचारसंहितेचे दोन वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे त्याला पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले. हरमनप्रीतने गुन्ह्याची कबुली दिल्याचे आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आयसीसीने म्हटले होते की, “भारतीय कर्णधाराने गुन्हा कबूल केला आणि एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय मॅच रेफरींच्या अख्तर अहमद यांनी प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना सहमती दर्शवली. परिणामी, औपचारिक सुनावणीची आवश्यकता नसल्याने दंड ताबडतोब लागू करण्यात आला.”

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ढाका येथे शनिवारी (२२ जुलै) बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यात भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना १३९ धावांत विकेट्स गमावले होते. यास्तिका भाटिया ५ आणि शफाली वर्माने ४ धावा करून बाद झाल्या. स्मृती मंधानाने ५९ धावा केल्या. मंधाना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हरलीन देओलला साथ देण्यासाठी क्रीझवर आली, पण तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीत १४ धावा करून नाहिदा अख्तरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाली.

हेही वाचा: Babar Azam: चाहत्याला जर्सी गिफ्ट केल्यानंतर केवळ ‘स्पोर्ट्स ब्रा’वर असणारा बाबर आझम का ट्रोल होत आहे? पाहा Video

हरमनप्रीतने ३४व्या षटकात नाहिदाचा चौथा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण ती शॉट चुकली. गोलंदाज आणि सहकारी खेळाडूंनी आऊटसाठी अपील केल्यावर अंपायरने हरमनप्रीतविरुद्ध निर्णय दिला. आऊट दिल्यानंतर तिला राग आला. तिने रागाच्या भरात स्टंपवर बॅट मारून फेकली. त्यानंतर पॅव्हेलियनकडे जाताना तिने अंपायरला सूचित केले की, चेंडू बॅटला आधी लागला होता. याशिवाय हरमनप्रीतने प्रेक्षकांना अंगठाही दाखवला. यानंतर तिने याबाबत प्रेझेंटेशन दरम्यान यावर कमेंट केली. त्यामुळे तिच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader