Anshul Kamboj picks up 10 wickets in Ranji Trophy: रणजी करंडक स्पर्धेत हरयाणाकडून खेळणाऱ्या अंशुल कंबोजने एका डावात १० पैकी १० विकेट्स घेत नवा विक्रम रचला आहे. केरळ संघाविरुद्ध रोहतक सुरू असलेल्या लढतीत अंशुलने शॉन रॉजरला बाद करत डावातील सगळ्या विकेट्स पटकावण्याचा मान मिळवला. रणजी करंडक स्पर्धेत एका डावात १० विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. १९५६-५७ मध्ये प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी तर प्रदीप सुदरमन यांनी १९८५-८६ मध्ये १० विकेट्स घेण्याची करामत केली होती.

भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० पैकी १० विकेट्स पटकावण्याचा मान सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे आणि देबाशीष मोहंती यांनी पटकावला होता. शुक्रवारी खेळ सुरू झाला तेव्हा विक्रमासाठी अंशुलला २ विकेट्सची आवश्यकता होती. तीन षटकात २ विकेट्स घेत अंशुलने दुर्मीळ विक्रम नावावर केला. ३०.१ षटकात ९ निर्धाव षटकांसह ४९ धावांच्या मोबदल्यात अंशुलने १० विकेट्स पटकावल्या. केरळ संघात बाबा अपराजित, रोहन कन्नूमल, सचिन बेबी, जलाज सक्सेना अशा अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. पण अंशुलच्या भेदक माऱ्यासमोर केरळच्या सर्वच फलंदाजांनी शरणागती पत्करली. केरळतर्फे रोहन कन्नूमल (५५), अक्षय चंद्रन (५९), मोहम्मद अझरुद्दीन (५३) यांनी अर्धशतकी खेळी केली. केरळचा डाव २९१ धावात आटोपला.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

२०२२ मध्ये अंशुलने हरयाणासाठी खेळायला सुरुवात केली. २०२३-२४ हंगामात विजय हजारे स्पर्धेत अंशुल हरयाणासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी होता.

यंदाच्या वर्षीच अंशुलने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. मुंबई इंडियन्स संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. दोन सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. अंशुलने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं होतं. ग्लेन मॅकग्रा हा अंशुलचा आदर्श आहे. हरयाणातलं करनाल हे अंशुलचं गाव. बॉक्सिंगपटूंसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. १४व्या वर्षी त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अंशुलने आगामी आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर दमदार कामगिरीसह फ्रँचाइजींना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.