Antim Panghal Breaks Silence on Sisters Arrest Shared Video: भारताची कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने वादात अडकलेल्या तिच्या बहिणीला ताब्यात घेऊन भारतात रवानगी केल्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. अंतिम पंघालच्या बहिणीने तिचे मान्यतापत्र वापरून ऑलिम्पिक क्रीडा नगरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. यानंतर अंतिम पंघाल, तिचे प्रशिक्षक व इतर सपोर्ट स्टाफला ऑलिम्पिक क्रीडा नगरी सोडण्यास सांगण्यात आले. आता या प्रकरणाबाबत अंतिमने एक व्हिडिओ शेअर करून या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Javelin Throw Final Live : नीरज चोप्रा पदकावर शिक्कामोर्तब करण्यास सज्ज, अमन सेहरावत उपांत्य फेरीत पराभूत

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Dead body girl drain Govandi, Dead body of a girl, Govandi,
मुंबई : गोवंडीतील नाल्यात सापडला दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह
walmart indian girl death
कॅनडात वॉलमार्टमधील वॉक इन ओव्हनमध्ये आढळला शीख तरुणीचा मृतदेह
Kaveri Chowk in Dombivli MIDC is prone to accidents due to hawkers traffic and vehicles in chowk
डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकाला फेरीवाल्यांचा विळखा, विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी
H( प्रातिनिधिक छायाचित्र )uman bomb threat on plane Threat in the name of a woman in Andheri Mumbai news
विमानात मानवी बॉम्बची धमकी; अंधेरीतील महिलेच्या नावाने धमकी
woman dies after falling from local train Incident between ambernath badlapur station
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल

अंतिम पंघालवर हिच्यावर ऑलिम्पिक व्यवस्थापनानं घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या नियमभंगामध्ये अंतिम पंघालच्या बहिणीला पॅरिस पोलिसांनी ताब्यातही घेत तिची चौकशी केल्यानंतर तिला पोलिसांनी सोडलं, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर अंतिम पंघालला पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आणि तिची सपोर्ट स्टाफसह तिची पुन्हा भारतात रवानगी करण्यात आली आहे अशी मोठी बातमीही समोर आली होती. पण आता याबाबत एक व्हीडिओ शेअर करत अंतिम पंघालने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Final: नीरज चोप्राला तगडी टक्कर देणारा जॅकब वडेलज नेमका आहे तरी कोण? भालाफेक रॅकिंगमध्ये आहे जगातील नंबर वन खेळाडू

अंतिम पंघालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “मी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी आले होते, पण मी सामना हरले. माझ्या बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कालपासून चर्चा सुरू आहे. असे काहीही झालेले नाही. सामना गमावला तेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती. मला माझी बहीण ज्या हॉटेलमध्ये राहते तिथे जायचे होते. यासाठी मी माझ्या प्रशिक्षकाची परवानगीही घेतली होती. यानंतर मी हॉटेलमध्ये आले. मला काही सामान हवे होते, जे क्रीडानगरीत होते. प्रकृती ठीक नसल्यामुळे माझी बहीण ते सामान आणण्यासाठी क्रीडा नगरीत गेली होती. तिने तिथे जाऊन विचारले की हे माझ्या बहिणीचे कार्ड आहे, मी तिचे सामान घेऊ शकते का? त्यांनी ओळखपत्र घेऊन पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी नेले. यानंतर तिला मान्यतापत्र देऊन परत पाठवण्यात आले.”

हेही वाचा – India vs Spain: ग्लोव्हज, हेल्मेटसमोर नतमस्तक अन् मग थेट चढून गोलपोस्टवर बसून श्रीजेशने साजरा केला अखेरच्या सामन्याचा विजय, पाहा VIDEO

अंतिम पुढे म्हणाली, “माझ्या कोचचे कॅब चालकाशी भांडण झाल्याचे बोलले जात आहे. असे काही घडले नव्हते. सामना संपल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. त्यानंतर कोच क्रीडानगरीत थांबले होते. आम्हीच त्यांच्यासाठी कॅब बुक केली होती. आमची भाषा वेगळी असल्याने थोडी अडचण आली कारण कॅब ड्रायव्हर म्हणत होता की आमच्याकडे पुरेसे युरो नाहीत. आम्ही पैसे घेण्यासाठी आलो तेव्हा थोडा वाद झाला. पण जसे पसरवले जात आहे तसे काहीही झाले नाही.”

भारतात रवानगी करण्याबाबत ती म्हणाली, “माझा सामना संपल्यावर मी फेडरेशनला मला तिकीट मिळावी यासाठी कॉल केला होता, मी भारतात परत येत आहे. हे सर्व आधीच घडले होते, आपणास विनंती आहे की अशा गोष्टी पसरवू नका. माझी स्थिती फार चांगली नाहीय, मला साथ द्यावी.”