हैदराबादमध्ये झालेल्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात विजय प्राप्त करून भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खिशात घातली. पण, टीम इंडियाच्या या विजयी हॅट्रिकसोबतच हैदराबादच्या स्टेडियमवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली ती कर्णधार विराट कोहलीची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची उपस्थिती.
विराटच्या अर्धशतकी खेळीतल्या प्रत्येक फटकेबाजीला अनुष्का टाळ्या वाजवून दाद देताना दिसली. मग, विराटनेही आपले अर्धशतकाच्या उत्साहात अनुष्काला फ्लाईंग किसची भेट दिली. त्यामुळे एकाप्रकारे विराटने आपल्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुलीच हैदराबादच्या स्टेडियमवर दिली.
या दोघांनी आपल्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांना अद्याप प्रेमाची उपमा दिलेली नाही. आपण केवळ एकमेकांचे चांगले मित्र असून, आपल्यात तसे काही नसल्याचे सांगत लपूनछपून भेटणारी ही जोडी, सध्या खुल्लमखुल्ला अगदी बिनधास्तपणे आपल्या सार्वजनिक जीवनात एकत्र वावरताना दिसत आहेत. या दोघांनीही आतापर्यंत उघडपणे आपल्या नात्याची कबुली देणे टाळले असले तरी, ‘ये पब्लिक है सब जानती है..’
‘फोटो गॅलरी’ पाहण्यासाठी खालील ‘स्लाईड शो’वर क्लिक करा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा