Happy Birthday Virat Kohli: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, संपूर्ण जग विराट कोहलीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत आहे. विराटचे चाहते त्याला सतत सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आजपर्यंत जे काही मिळवले आहे, त्याचे श्रेय तो पत्नी अनुष्काला देतो. प्रत्येक वेळी कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का अनेक न पाहिलेले फोटो शेअर करत असते. चाहते अनुष्काच्या पोस्टची वाट पाहत असतात आणि यावेळीही असेच काहीसे घडले आहे.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट –

विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनुष्काने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटो एका बातमीचा काही भाग आहे, ज्यात विराट कोहलीच्या गोलंदाजीच्या विक्रमाबद्दल लिहिले होते. या विक्रमानुसार कोहलीने टी-२० कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतली होती, जो वाइड बॉल होता. यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये कोहली विचित्र एक्सप्रेशन देताना दिसला. तिसऱ्या फोटोत विराट आणि अनुष्का एकत्र दिसत आहेत.

Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Virat Kohli Gives Bats and Kit Bags as Gifts to Delhi Domestic Players on Ranji Trophy Return
Virat Kohli: विराट कोहलीने जिंकली सर्वांची मनं, दिल्लीच्या खेळाडूंना रणजीदरम्यान भेट दिल्या खास गोष्टी
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Ranji Trophy 2025 Virat Kohli Declines Team Managers offer during Ranji Trophy Camp wins gearts for his simplicity vbm 97
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीने रणजी सामन्यापूर्वी ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, सर्वत्र होतय कौतुक
Virat Kohli play in Ranji Trophy 2025 crowd of fans gathering outside Arun Jaitley watching Virat video viral
Virat Kohli Ranji Trophy : विराटला १३ वर्षांनंतर रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, अरुण जेटली स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगा

विराटसाठी खास कॅप्शन –

अभिनेत्री अनुष्का शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘विराट प्रत्येक भूमिकेत सर्वात आघाडीवर राहिला आहे, तरीही तो कोणते ना कोणते यश मिळवत राहतो. मी तुझ्यावर कायम असेच प्रेम करीन, प्रत्येक क्षणी, काहीही झाले तरी.’ अनुष्काच्या या पोस्टवर कमेंट्सचा महापूर आला आहे. पत्नीच्या या पोस्टवर विराटनेही प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही चाहत्यांनी विराटला गोलंदाजी करू देण्याचे आवाहन केले होते. यानंतर राहुल द्रविडनेही पत्रकार परिषदेत हेच सांगितले.

हेही वाचा – Virat Kohli Birthday: …म्हणून विराट कोहली १८ नंबरची जर्सी घालतो; जाणून घ्या कारण आणि हिंदू धर्मात या संख्येचे महत्व

कोहलीच्या वाढदिवशी भारताच्या नावावर मोठा विक्रम आहे –

विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघासाठी खूप भाग्यवान ठरला आहे. आतापर्यंत ५ नोव्हेंबरला झालेल्या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. आता संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तेच आवडेल.

Story img Loader