Anushka Sharma Big Statement on Parenting: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या बऱ्याच काळापासून भारताबाहेर आहे. विराट कोहली क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने भारतात आला होता. पण अनुष्का बराच काळ मुलांबरोबर लंडनमध्येच होती. अनुष्का आणि विराटचे लंडनमधील व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनुष्का आणि विराट दोन मुलांचे आईबाबा आहेत. अनुष्का एका कार्यक्रमासाठी भारतात आली आहे. तिचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने पालकत्वावर मोठे वक्तव्य केले आहे. अनुष्काने मुंबईत स्लर्प फार्मच्या येस मॉम्स अँड डॅड्स इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्का शर्मा तिचा मुलगा अकायच्या जन्मापासून लंडनमध्ये राहत आहे. अनुष्का आणि विराट कोहली कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याचेही वृत्त समोर आले. अनुष्काने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यापासून ती फार कमी कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. मात्र बुधवारी अनुष्का बऱ्याच दिवसांनी मुंबईतील एका कार्यक्रमाचा भाग बनली. यादरम्यान अनुष्का शर्माने पालकत्व आणि ‘परफेक्ट आई’ होण्याचं असलेलं टेन्शन यावर बोलली आहे.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या कॅचची तुफान चर्चा, मागे धावत जात ऋषभ पंतच्या शॉट्चा टिपला अफलातून झेल, VIDEO व्हायरल

परफेक्ट पालक होण्याचे दडपण

अनुष्का म्हणाली, ‘परफेक्ट पालक होण्याचे दडपण खूप जास्त असते. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, ‘आपण परफेक्ट नाही आहोत आणि त्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही परफेक्ट पालक नाही आहोत. कदाचित आपण काही गोष्टींबद्दल तक्रार करत असू आणि आपल्या मुलांसमोर या गोष्टी बोलण्यात काहीच गैर नाही. जेणेकरून त्यांनाही कळेल की त्यांचे पालकही चुका करतात. ती म्हणाली की, तुमच्या चुका तुमच्या मुलांसमोर बोलणं किंवा त्यांना पटवून देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे त्यांच्यावरील दबाव कमी होतो. मुलं काय विचार करत असतील याचाही विचार करून पाहा, ‘माझे आई-वडील असेच आहेत आणि आता मलाही या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.’

हेही वाचा – Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने राजकारणात ठेवले पाऊल, पत्नी रिवाबा जडेजाने फोटो शेअर करत दिली माहिती

अनुष्काने असेही सांगितले की, आई झाल्यानंतर तिचे जीवनही खूप विकसित झाले आहे. अनुष्का म्हणाली, ‘आता मी अशाच लोकांसोबत हँग आउट करते, पण असा विचार करणारे लोक खूप कमी आहेत.’ हे सांगताच ती हसायला लागली. अनुष्का म्हणाली की, अनेकदा लोक आम्हाला जेवायला बोलावतात, मग ती त्यांना सांगते, ‘जेव्हा आम्ही जेवण करू, तेव्हा तुमची नाश्त्याची वेळ होईल.’ त्याच कार्यक्रमात अनुष्काने सांगितले की तिची मुलगी वामिका संध्याकाळी ५.३० वाजता रात्रीचं जेवण करते.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO

अनुष्का म्हणाली की ती आणि विराट मुलांना गोष्टी समजावून सांगण्याऐवजी दाखवून शिकवण्याचा प्रयत्न करतात. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझी मुलगी खूप लहान आहे त्यामुळे मी तिला काहीही शिकवू शकत नाही. खरे तर या गोष्टी शिकवायच्या नसून आपण कसे जगतो हे महत्त्वाचे आहे. आपण दिवसभरात कोणाचे आभार मानतो का? आपली मुलं इथूनच शिकतात. मुलांना त्यांच्या सभोवतालचे वातावरणातून शिकत असतात आणि हळूहळू मुलंही तशीच होतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma statement on perfect parenting said i and virat are not perfect couple watch video bdg