Virat Kohli Anushka Sharma Playing Cricket Video Viral: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सर्वाेत्तम जोडप्यांपैकी एक आहे. नुकताच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये दोघेही क्रिकेट खेळताना दिसत आहेत. दोघांनीही एकमेकांनी गोलंदाजी केली. तर अनुष्का शर्मा नव्या नियमांसह क्रिकेट खेळताना दिसली. विराटने अनुष्काला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं तर अनुष्काने विराटला असा काही बाऊन्सर टाकला की विराट घाबरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अलीकडेच एका स्पोर्ट्सवेअर ब्रँडचा प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट एकमेकांना क्रिकेटमध्ये आव्हान देताना दिसत होते. अनुष्काने कोहलीसोबत क्रिकेट खेळण्यापूर्वी काही अटी सांगितल्या, ज्या ऐकून विराटलाही धक्काच बसला.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

Virat vs Anushka Cricket Video: अनुष्का शर्माचे आगळेवेगळे क्रिकेटचे नियम

अनुष्का क्रिकेट खेळायला सुरूवात करण्यापूर्वी नियमावली वाचून दाखवली. नियम क्रमांक २ – जर तीन वेळा चेंडू खेळायला चुकला तर तू आऊट. नियम क्रमांक २- बॉल तुझ्या शरीरावर तीन वेळा आदळला तरी आऊट. नियम क्रमांक ३- वेडेवाकडे चेहरे केले तरी आऊट देणार. तेवढ्यात विराट अनुष्काला थांबवतो आणि तिला सांगतो मला तू नियम नको शिकवू खेळायला सुरूवात कर… तितक्यात अनुष्का म्हणते नियम ५ – ज्याची बॅट तो पहिली फलंदाजी करणार.

हेही वाचा – IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO

विराटने पहिल्याच चेंडूवर अनुष्का शर्माला केलं क्लीन बोल्ड

विराट कोहली अनुष्का शर्माला पहिल्या २ चेंडूवरच आऊट करतो. पण पहिल्या चेंडूवर बाद झाल्यावर अनु्ष्का सांगते नियम क्र. ६ पहिला चेंडू सरावासाठी असेल. यानंतर जेव्हा अनुष्काची गोलंदाजी करायची येते तेव्हा ती विराट कोहलीला एकामागून एक चेंडू टाकत असते. पहिल्याच चेंडूवर विराट मोठा फटका खेळतो. तितक्यात अनुष्का नवीन नियम आणते आणि सांगते “जो मोठा फटका खेळणार तोच बॉल घेऊन येणार.”

यानंतर विराट चेंडू घेऊन येऊन फलंदाजीसाठी तयार होत असतो. तितक्यात अनुष्का चेंडू टाकून विराट आऊट झाल्याचं सांगते आणि तितक्यात विराट रागवतो. अनुष्काचा अजून एक नियम येतो आणि ती म्हणते “तू भडकलास रागवलास तर तू आऊट…” विराट तिथून रागावून जातो आणि बोलतो, “जा रे मी नाही खेळणार…”

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूत

थोड्यावेळाने विराट पुन्हा खेळायला येतो. पुढच्या चेंडूवर तो अनुष्काच्या दिशेने सरळ रेषेत शॉट मारतो आणि अनुष्का खाली बसून दचकते. यानंतर अनुष्का सलग दोन बाऊन्सर टाकते. दुसरा बाऊन्सर विराट कोहलीच्या डोक्याला लागणार असतो पण तो थोडक्यासाठी वाचतो. जेव्हा अनुष्का बाऊन्सर मारतो तेव्हा विराट कोहली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो – “तू काय माझं डोकं फोडायला बघतेस का?” विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma throws bouncer to virat kohli while playing gully cricket in viral video bdg