बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातलं एक लोकप्रिय जोडपं म्हणजे विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. हे दोघे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी कपल गोल्स आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दलच्या पोस्ट्स टाकत असतात. आताही अनुष्का शर्माने पती विराटला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत एक रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुष्का शर्माने तिचा आणि विराटचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने आपल्या पतीचं कौतुकही केलेलं आहे. अनुष्का म्हणते, “या फोटोसाठी आणि ज्या पद्धतीने तू तुझे जीवन जगतोस त्यासाठी फिल्टरची गरज नाही. तू प्रामाणिकपणे आणि धैर्याने परिपूर्ण आहेस. तुझ्या धैर्यामुळे सगळ्या चिंता दूर होतात. आपल्या आयुष्यातल्या वाईट काळातून सावरु शकलेला माझ्या पाहण्यातला तू एकमेव आहेस.

अनुष्का या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “तू उत्तम पद्धतीने वाटचाल करत आहेस कारण तू कोणत्याही गोष्टीबद्दल मनात अढी ठेवत नाहीस आणि तू निर्भय आहेस. मला माहित आहे, आपण असं सोशल मीडियावर बोलणाऱ्यांपैकी नाही. पण कधी कधी मला जगाला ओरडून सांगायचंय की तू किती भारी व्यक्ती आहेस. तुला ओळखणारे खरंच भाग्यवान आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रकाशमान आणि सुंदर बनवण्यासाठी धन्यवाद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा, क्यूटनेस.”

अनुष्काची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक जणांनी या दोघांचं कौतुकही केलं आहे. तर विराटनेही अनुष्काच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तो म्हणतो, “तू माझी ताकद आहेस. मला मार्ग दाखवणारी तू शक्ती आहेस. मी देवाचे रोज आभार मानतो की आपण दोघे एकत्र आहोत, आय लव्ह यू”.

सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभव पत्करला. हा दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी सोशल मीडियावरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. विराट कोहलीनेही शमीला पूर्णपणे पाठिंबा दिला. लक्ष्य’ करणाऱ्या धर्मांधांना विराटने खडसावले आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत दिले. विराटच्या या वक्तव्यानंतर काही विकृतांनी असभ्यपणे त्याच्या दहा-वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले. त्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.