भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दोन्ही संघ मोहालीत पोहोचले आहेत. या सामन्यासाठी विराट कोहलीही मोहालीला पोहोचला आहे. दरम्यान, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात ती सांगते की, “तुझ्या सोबत राहून हे जग खूप सुंदर वाटते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पत्नी अनुष्का शर्माला त्याच्या आठवणीने पछाडले आहे. तिने इंस्टाग्रामवर विराटसोबतचा फोटोसह एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ या माणसासोबत जेव्हा मी असते तेव्हा मला हे जग अधिक सुंदर वाटते. आयुष्य प्रकाशमय झाले असून ही भावनाच माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मग ते यासारख्या सुंदर ठिकाणी किंवा हॉटेलच्या बायो-बबलमध्ये असो.”

यापूर्वी विराट कोहली आशिया चषक २०२२ मध्ये खेळण्यासाठी गेला होता. तिथे, भारतीय संघाला निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला होता. पण, त्यात त्याची कामगिरी चांगली झाली होती. या स्पर्धेत त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. त्याने पाच सामन्यात १४८ च्या स्ट्राईक रेटने २७६ धावा केल्या. कोहलीने आशिया चषकमध्ये भारताच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. तब्बल १०२० दिवसांनंतर त्याच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. याआधी त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता कसोटीत शतक झळकावले होते.

हेही वाचा: सिंगापूरकडून १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला खेळाडू आता ऑस्ट्रेलिया संघाकडून भारताविरुद्धच्या टी२० सामन्यात करणार पदार्पण, नक्की कोण वाचा

विराटच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकानंतरही अनुष्काने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते की, “सदैव तुझ्यासोबत.. प्रत्येक परिस्थितीत असेन.” दुसरीकडे कोहलीने आपले शतक पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाला समर्पित केले. तो म्हणाला की, “मी कृतज्ञ आहे, गेली अडीच वर्षे मला खूप काही शिकवून गेली. मी लवकरच ३४ वर्षांचा होणार आहे. तुम्ही मला इथे पाहता आहात पण यापाठीमागे माझी पत्नी अनुष्का आहे आणि तिच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मी हे करू शकलो.”

दरम्यान, अनुष्का तब्बल ५ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘चकडा एक्सप्रेस’ मध्ये ती दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.