भारत-पाकिस्तान यांच्यात होणा-या चॅंम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज तयार झाला असून, त्याच्या म्हणण्यानुसार दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा प्रत्येक सामना नेहमी विशेष असतो.
पाक संघ, भारताविरूध्दच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करत असून, सर्वजण मोठ्या आतुरतेने सामन्याच्या दिवसाची वाट पाहत आहेत. या सरावाचा परिणाम स्पर्धेच्या निर्णायक क्षणांवर होणार आहे, असे  हफिजने आयर्लंड येथे पाकिस्तानी पत्रकारांना सांगितले.
येत्या १५ जूनला एजबॉस्टनला भारत-पाक दरम्यान पहिला सामना होणार असून, “भारता विरूध्दचा सामना आमच्यासाठी नेहमी विशेष असतो आणि आम्ही नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहत आहोत व त्याच जिद्दीने खेळणार आहोत.”, असे पाकिस्तानच्या टी-ट्वेन्टी संघाचा कर्णधार हाफिज म्हणाला.
” भारताविरूध्दचा सामना जबरदस्त असेल आणि भारताविरूध्द खेळायला मला खूप आवडते. कारण त्यावेळचे वातावरण हे वेगळेच असते. दोन्ही संघ १०० टक्के जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी ब्रिटीश वातावरणात खेळण्याचा अनुभव वेगळा असणार आहे.” असेही हफिज म्हणाला.
पाकित्तान संघातील बरेच खेळाडू इंग्लंड मध्ये लीग व कौंटी क्रिकेट खेळले आहेत, त्याचा फायदा संघाला होईल, असे हफिजला वाटते.
“हा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा असेल, त्यासाठी मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही आयर्लंड, स्कॉटलंडमध्ये आणि त्यानंतर इंग्लंड मध्ये सराव करणार आहोत.”
असे हफिज म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा