Archer Aditi Swamy and Ojas Praveen are students of Devtale Praveen Sawant’s academy: महाराष्ट्रातील सातारा येथील पोलीस हवालदार प्रवीण सावंत यांना आता आशा आहे की, भारताच्या दोन विश्वविजेत्या आदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांच्या निर्मितीनंतर त्यांच्या तिरंदाजी प्रशिक्षण अकादमीला एक एकर ऊसाच्या शेतात मान्यता मिळेल. अदिती आणि देवतळे या दोघांनी वर्ल्ड चॅम्पियन होण्यापूर्वी साताऱ्यातील वाधे फाटा परिसरातील दृष्टी अकादमीमध्ये सावंत यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आहे.
सातारा येथील रहिवासी असलेली अदिती शनिवारी वयाच्या १७ व्या वर्षी सर्वात तरुण ज्येष्ठ विश्व चॅम्पियन बनली, जेव्हा तिने बर्लिन येथे जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड महिला सुवर्णासह भारताचे पहिले वैयक्तिक विजेतेपद पटकावले. त्यानंतर ओजस देवतळे देखील १५० च्या अचूक स्कोअरसह कंपाऊंड पुरुषांचे विजेतेपद जिंकून जगज्जेते ठरला. या दोघांनी प्रवीण सांवत यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर ही कामगिरी केली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण सावंत यांनी सांगितले की, “अदिती जेव्हा माझ्याकडे आली होती, तेव्ही ती अप्रभावी होती. त्यावेळी आदिती १० वर्षांची सड-पातळ मुलगी होती. पण तिच्या जिद्दीने माझे लक्ष वेधून घेतले आणि हा प्रवास सुरू झाला. ती खरोखर मेहनती होती, स्पर्धेनंतरही ब्रेक घेत नसत आणि तासनतास इथे सराव करत असे. ती एक भावी चॅम्पियन आहे, हे मला माहीत होते.” देवतळेबद्दल बोलताना सावंत म्हणाले, “त्याचे तिरंदाजी अपारंपरिक पण प्रभावी होती. मला फक्त त्याला प्रेरित करायचे होते आणि त्याला मानसिकदृष्ट्या तयार करायचे होते. बाकीचे काम त्याने केले.”
तिरंदाजी प्रशिक्षक होण्याचा प्रवास आता एनआयएस प्रमाणपत्र धारक असलेल्या सावंत यांच्यासाठी अनेक धक्के आणि अडचणींचा राहिला आहे. ३२ वर्षीय सावंत यांनी झारखंडमधील स्कूल नॅशनलमध्ये रौप्य पदक जिंकले होते. परंतु नंतर ते यात यशस्वी होऊ शकले नाही. त्यानंतर २०९-११ मध्ये एका खाजगी रुग्णालयात अर्धवेळ वॉर्ड बॉय म्हणून काम केले. तिथे ते दिवसा हॉस्पिटलची ड्युटी करायचे आणि संध्याकाळी ते अकादमीत बराच वेळ तिरंदाजीचा सराव करायचे. त्यांच्यामधील ही खेळाची आवड पाहून त्याच रुग्णालयातील औषध दुकानाचे मालक मानवेंद्र कदम यांनाही त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली.
तिरंदाजी प्रशिक्षक सावंत म्हणाले, “टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी मी मुलांना प्रशिक्षण देण्यासोबतच माझी स्वतःही सराव करत होतो. अदिती तोपर्यंत सामील झाली होती आणि जिंकू लागली होती. पण योग्य सुविधेचा अभाव हा अडथळा होता. कारण मी त्यांना अकादमीत आणि नंतर इतर काही तात्पुरत्या सुविधेत शिकवायचो.”त्यानंतर कदम सावंत यांच्या मदतीला आले आणि त्यांनी त्यांना एक एकर जमीन देण्याचे ठरवले, जेथे ते ऊसाचे पीक घेत असत. मात्र जमीन मिळणे पुरेसे नव्हते, सावंत यांना भिंती बांधण्यासाठी, जमिनीला आकार देण्यासाठी पैशांची गरज होती. त्यावेळी त्यांची पत्नी आणि आई त्याच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांचे दागिने गहाण ठेवण्यास तयार झाल्या.
हेही वाचा – Archery WC: जगात भारी महाराष्ट्रीयन नारी! सातारच्या लेकीने एकाच हंगामात दोन विजेतेपद जिंकत रचला इतिहास
सावंत याबद्दल बोलताना म्हणाले, “मला दागिन्यांच्या बदल्यात २ लाख रुपये मिळाले, पण दागिने अजूनही बँकेत गहाण आहेत. आई-वडिलांनीही हातभार लावला आणि दृष्टी अकादमी स्वतःची झाली. गेल्या वर्षी आम्ही फ्लडलाइट्स लावले आणि सुमारे १५ लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. मी येथे बहुतेक मुलांसोबत असतो आणि त्यामुळे प्रशिक्षणात मदत होते. मात्र आमच्याकडे अजूनही योग्य उपकरणे नाहीत. मी जिल्हा परिषदेला पत्र लिहिले आहे, पण फायली पुढे सरकल्या नाहीत. पण मला खात्री आहे की त्यांच्या (अदिती आणि देवतळे) यशानंतर लोक आता तिरंदाजी अकादमीकडे बघतील आणि त्याला केंद्राचा दर्जा मिळेल, अशी आशा आहे.”