भारताच्या महिला तिरंदाजी संघाने पोलंडमध्ये तिरंगा फडकवला आहे. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय तिरंदाजी महिला संघाने रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
भारताच्या दीपिका कुमारी, लैशराम बोम्बायला देवी आणि रिमी ब्रुईली या तिघींनी भारताला सलग दुसऱया विश्वचषकात सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अंतिम सामन्यात दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेधी कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण कोरियावर २१९-२०५ अशी मात करत पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी बजावली आहे. याआधी जुलै महिन्यात कोलंबियामध्ये झालेल्या विश्वचषकातही भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक मिळविले होते. यावेळी पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावत भाराताच्या महिला संघाने तिरंदाजीत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Story img Loader