पीटीआय, अंताल्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय तिरंदाजांनी कम्पाऊंड प्रकारात अक्षय्य तृतीयेच्या दिनी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. यामध्ये अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमने मिळवलेले यश लक्षवेधी ठरले. सकाळच्या सत्रात ओजस देवतळेच्या साथीने मिश्र दुहेरीत सोनेरी यश संपादल्यानंतर ज्योतीने दुपारच्या सत्रात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली.

मिश्र दुहेरीत ज्योती-ओजसने तैवानच्या जोडीचा १५९-१५४ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. या वेळी भारतीय जोडीचा विक्रम थोडक्यात हुकला. अखेरच्या फेरीत ज्योतीने आपले आठही तीर अचूक मारताना प्रत्येक वेळेस दहा गुणांची कमाई केली. पदार्पण करणाऱ्या ओजसनेही अचूक लक्ष्य साधले. मात्र, त्याचा अखेरचा तीर नऊ गुणांवर लागला आणि भारताचा जागतिक विक्रम अवघ्या एका गुणाने हुकला.

भारताचे हे विश्वचषकातील कम्पाऊंड प्रकारात मिश्र दुहेरीत दुसरे सुवर्णपदक ठरले. गेल्या वर्षी ज्योतीने अनुभवी अभिषेक वर्माच्या साथीने तिसऱ्या टप्प्यातील विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. ज्योतीने नंतर दुपारच्या सत्रात वैयक्तिक प्रकारात २०२१ स्पर्धेतील आपल्या रौप्यपदकाचा रंग बदलताना सोनेरी केला. ज्योतीने अंतिम फेरीत कोलंबियाच्या सारा लोपेझचा १४९-१४६ अशा फरकाने पराभव केला. ज्योतीने या सोनेरी यशाने २०२१च्या स्पर्धेतील सुवर्ण लढतीत झालेल्या पराभवाची परतफेड केली.