मुंबई : मुंबई ट्वेन्टी-२० लीगमध्ये अखिल हेरवाडकरच्या तुफानी खेळीमुळे आर्क्‍स अंधेरी संघाने शिवाजी पार्क लायन्स संघाला पराभूत केले. विजयात निर्णायक भूमिका पार पाडताना हेरवाडकरने नाबाद ७९ धावांची खेळी केली.

१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आर्क्‍स अंधेरीच्या हेरवाडकर व सुफियान शेख यांनी ६७ धावांची भागिदारी रचली. शेखला शिवम दुबेने माघारी धाडले. त्यानंतरच्या सात षटकांमध्ये आर्क्‍स अंधेरीने ३३ धावांवर तीन गडी गमावले. आर्क्‍स संघाला विजयासाठी सात षटकात ६० धावांची गरज होती. पण, हेरवाडकरने पंकज जैस्वाल, अझर अन्सारी, इकबाल अब्दुल्लाच्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला. त्यापुर्वी, रौनक शर्माने ३० चेंडूत नाबाद ५१ धावा करीत शिवाजी पार्क लायन्स संघाच्या धावसंख्येला ६ बाद १५९ पर्यंत पोहोचवले.

संक्षिप्त  धावफलक 

शिवाजी पार्क लायन्स : २० षटकात ६ बाद १५९ धावा (रौनक शर्मा नाबाद ५१, स्वप्निल प्रधान ४४, इकबाल अब्दुल्ला २/१६) पराभूत वि. आर्क्‍स अंधेरी : १९.५ षटकात ६ बाद १६३ धावा ( अखिल हेरवाडकर नाबाद ७९, सुफियान शेख २५, शिवम दुबे २/४१, )

सामनावीर : अखिल हेरवाडकर