Lionel Messi became the most decorated player in football history : अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका फायनल जिंकून आपल्या महान कामगिरीत आणखी एक भर घातली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या अंतिम फेरीत ला अल्बिसेलेस्टेने कोलंबियाचा १-० असा पराभव केला. कोपा अमेरिका विजेतेपदाने मेस्सीला एक ऐतिहासिक यश मिळवून दिले. आता मेस्सी ब्राझीलच्या डॅनी अल्वेसचा विक्रम मोडत क्लब आणि देश या दोघांसह ४५ ट्रॉफी जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मेस्सीचा रोझारियो येथील एका लहान मुलापासून ते फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूपर्यंतचा प्रवास जबरदस्त राहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिओनेल मेस्सीने आतापर्यंत जिंकलेले पुरस्कार –

एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या मेस्सीने आता अर्जेंटिनासह अवघ्या तीन वर्षांत चार प्रमुख विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यामध्ये एक विश्वचषक, दोन कोपा अमेरिका विजेतेपदाचा समावेश आहे. त्याच्या शानदार क्लब कारकिर्दीत, मेस्सीने बार्सिलोनासह चार चॅम्पियन्स लीग विजेतेपदे आणि दहा ला लीगा चॅम्पियनशिप जिंकली आहेत. त्याच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याच्याकडे विक्रमी आठ बॅलन डी’ओर्स आणि सहा युरोपियन गोल्डन बूट आहेत. एकूणच, मेस्सीने १,०६८ सामन्यात १२१२ गोल आणि असिस्ट केले आहेत, ज्यामध्ये ८३८ गोल आणि ३७४ असिस्टचा समावेश आहेत. यापैकी बहुतेक विजय बार्सिलोनाबरोबरच्या १७ वर्षांच्या कार्यकाळात मिळवले.

लिओनेल मेस्सीची आतापर्यंतची कामगिरी –

त्याच्या पुरस्कारांमध्ये १२ लीग जेतेपदे (बार्सिलोनाबरोबर १०, पीएसजीसह दोन), चार यूईएफए चॅम्पियन्स लीग विजेते (सर्व बार्सिलोनासह) आणि १७ देशांतर्गत चषक (बार्सिलोनासह १५, पीएसजी आणि इंटर मियामीसह प्रत्येकी एक) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यानी तीन वेळा यूईएफए सुपर कप आणि तीन वेळा फिफा क्लब विश्वचषक जिंकला आहे. अर्जेंटिनासह, मेस्सीच्या विजयांमध्ये २००५ अंडर-१७ विश्वचषक, २००८ ऑलिम्पिक गेम्स, २०२१ कोपा अमेरिका, २०२२ फायनलसिमा आणि सर्वात संस्मरणीय म्हणजे २०२२ विश्वचषक, जिथे अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सवर विजय मिळवला.

हेही वाचा – Rohit Sharma : ‘येत्या काळात तुम्ही मला…’, हिटमॅनचे वनडे-कसोटी निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी फार पुढचा विचार…’

फायनल सामन्यात मेस्सीच्या घोट्याला गंभीर दुखापत –

कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीचा विजयाचा प्रवास आव्हानांशिवाय नव्हता. घोट्याच्या गंभीर दुखापतीमुळे ६४व्या मिनिटाला बाहेर पडला. असे असूनही संपूर्ण सामन्यात मेस्सीची उपस्थिती आणि नेतृत्व जाणवले. अर्जेंटिनाने आपली जिद्द दाखवून सामना अतिरिक्त वेळेत नेला. यानंतर ११२व्या मिनिटाला लॉटारो मार्टिनेझने शानदार गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला. ज्यामुळे मेस्सीला त्याच्या संघाबरोबर आनंदोत्सव साजरा करण्याची आणि स्टँडमधील अर्जेंटिनाच्या चाहत्यांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. लिओनेल मेस्सीची कारकीर्द त्याच्या अतुलनीय प्रतिभा, दृढनिश्चय आणि खेळाबद्दलच्या उत्कटतेचा पुरावा आहे. ज्याने फुटबॉलमधील खरा दिग्गज म्हणून त्याचा दर्जा वाढवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina football star lionel messi becomes most decorated player in football history with 45 trophies vbm