ब्युनोस आयर्स : आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अर्जेटिनाने २६ सदस्यीय संघ जाहीर करताना आघाडीपटूंवरच अधिक भर दिला आहे. अर्जेटिनाच्या संघात नऊ बचावपटू, सात मध्यरक्षक आणि सात आघाडीपटूंचा समावेश आहे.अर्जेटिनाने २०२१मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या संघातील २१ खेळाडूंना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले. कारकीर्दीत सलग पाचवी आणि बहुधा अखेरची विश्वचषक स्पर्धा खेळणारा ३५ वर्षीय लिओनेल मेसी अर्जेटिना संघाचे नेतृत्व करेल. हा संघ गेल्या ३५ सामन्यांत अपराजित आहे. कतार येथे होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अर्जेटिनाचा क-गटात सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंडसह समावेश आहे.
गोलरक्षक : एमिलिआनो मार्टिनेझ, गेरोनिमो रुइ, फ्रँको अरमानी
बचावपटू : नाहुएल मोलिना, गोन्झालो माँटिएल, मार्कोस अकुना, ख्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेझ्झेला, निकोलस ओटामेण्डी, लिसाण्ड्रो मार्टिनेझ, निकोलस टॅग्लिआफिको, ज्युआन फोएथ
मध्यरक्षक : रॉड्रिगो डी पॉल, लिआण्ड्रो पेरेडेस, ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर, गुईडो रॉड्रिगेझ, पापु गोमेझ, एन्झो फर्नाडेझ, एझिक्युएल पॅलासिओस
आघाडीपटू : अँजेल डी मारिया, लॉटारो मार्टिनेझ, ग्वाकिन कोरेआ, ज्युलियन अल्वारेझ, पाव्लो डिबाला, निकोलस गोन्झालेझ, लिओनेल मेसी.