Lionel Messi Won Fifa Best Player: अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सीला फिफाचा पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला आहे. त्याचबरोबर महिला गटात स्पेनच्या अलेक्सिया पुटेलासने ही कामगिरी केली. पुटेलासने २०२२ मध्ये बॅलन डी’ओर जिंकला.
पॅरिसमधील सल्ले येथे झालेल्या समारंभात मेस्सी म्हणाला की, ”एवढ्या मोठ्या संघर्षानंतर त्यामागे जाऊन आणि खूप मेहनत घेतल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण करणे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” मात्र, फ्रान्सच्या एम्बाप्पेलाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र मेस्सीने त्याला येथेही हरवून हा पुरस्कार पटकावला. सर्वोत्तम खेळाडूसाठी मेस्सीला एम्बाप्पेपेक्षा सर्वाधिक मते मिळाली.
यादरम्यान मेस्सी म्हणाला की, ”ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर गोष्ट आहे. हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि फार कमी लोक ते पूर्ण करू शकतात. मी हे करू शकलो, त्यासाठी देवाचे आभार.” मेस्सीचा देशबांधव लिओनेल स्कालोनी याने वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक आणि एमिलियानो मार्टिनेझने वर्षातील सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार जिंकला. त्यांच्या समर्थकांना सर्वोत्कृष्ट चाहत्यांचा पुरस्कार देखील मिळाला, तर इंग्लंडला महिला युरो २०२२ चषकाने पुरस्कृत करण्यात आले.
राष्ट्रीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या जागतिक पॅनेलद्वारे, फिफाच्या २११ सदस्य देशांपैकी प्रत्येकी निवडलेल्या पत्रकारांनी आणि ऑनलाइन चाहत्यांनी केलेल्या मतदानाद्वारे तीन खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली होती. ३५ वर्षीय मेस्सीने फिफाद्वारे विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या गोल्डन बॉल ट्रॉफीच्या शर्यतीत एम्बाप्पेचा पराभव केला.
मेस्सीने ७०० क्लब गोल पूर्ण केले –
लिओ मेस्सीने अलीकडेच ऑलिम्पिक डी मार्सेल विरुद्ध लिग १ मध्ये पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळून इतिहास रचला. खरं तर, त्याने आपल्या क्लब करिअरमध्ये ७०० गोल पूर्ण केले होते. ज्यामध्ये त्याला पीएसजीचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पे शिवाय कोणीही मदत केली नाही. मेस्सीने त्याच्या माजी क्लब बार्सिलोना क्लबकडून खेळताना ६८२ गोल केले. त्याने आता पीएसजीसाठी २८गोल केले आहेत.
हेही वाचा – ENG vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवत रचला इतिहास; १४६ वर्षांनी इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव
फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात रोमहर्षक फायनलमध्ये पूर्णवेळ ३-३ अशी बरोबरी राहिल्यानंतर, मेस्सीच्या संघ अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला होता.