आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) २०२१ च्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. १८ फेब्रुवारी रोजी यंदाच्या हंगमाची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानं आपली नोंदणी केली आहे. अर्जुन तेंडुलकरची मूळ किंमत २० लाख रुपये आहे. अर्जुन तेंडुलकरला कोणता संघ विकत घेणार याबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे. पण या लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकर यानं अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट ‘अ’ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुन तेंडूलकर यानं आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली. अर्जुन तेंडूलकर यानं या सामन्यात ३१ चेंडूत विस्फोटक फलंदाजी करत ७७ धावांचा पाऊस पाडला. यासोबतच गोलंदाजी करताना तीन महत्वाचे बळीही मिळवले.

२१ वर्षीय अर्जुन तेंडुलकर यानं ३१ चेंडूचा सामना करताना पाच चौकार आणि आठ षटकारांचा पाऊस पडला. अर्जुन तेंडुलकर यानं फिरकीपटू हाशिर दाफेदार याच्या एका षटकात पाच षटकार लगावत विस्फोटक फलंदाजी केली. अर्जुन तेंडूलकरच्या या अष्टपैलू खेळीच्या बळावर एमआयजी क्रिकेट क्लबने पोलीस शील्ड क्रिकेट स्पर्धेत इस्लाम जिमखान्याचा १९४ धावांनी पराभव केला. एमआयजीनं ४५ षटकांत ७ बाद ३८७ धावां केल्या. मात्र, मिहिर अगरवालच्या ७७ धावानंतरही त्यांचा डाव १९१ धावांवर आचोपला.

Story img Loader