Arjun Tendulkar 9 Wickets Video: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटच्या मैदानावर आपलं नशीब आजमवत आहे. अर्जुन हा एक वेगवान गोलंदाज असून त्याच्या गोलंदाजीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. डावखुरा वेगवान गोलंदाज सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत खेळत आहे, जिथे त्याने गोव्याकडून खेळताना कर्नाटक संघाविरुद्ध भेदक गोलंदाजी केली. या रेड बॉल स्पर्धेत अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि १८९ धावांनी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Asian Champions Trophy: अपराजित भारतीय हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, द. कोरियाचा ४-१ ने पराभव, फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाचं आव्हान

अर्जुन तेंडुलकरने गोवा क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना सामन्यात एकूण ९ विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने पाच तर दुसऱ्या डावात अर्जुनने चार विकेट घेतले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुनच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू फेल ठरले.

अर्जुन तेंडुलकर पाच विकेट हॉल

अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात केवळ ४१ धावा देत ५ विकेट्स घेतले. अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनच्या पहिल्या पाचपैकी चार फलंदाजांना बाद केले आणि त्यानंतर अक्षन रावची विकेट घेत पाच विकेटचा टप्पा पूर्ण केला. केएससीए इलेव्हन संघाला पहिल्या डावात केवळ १०३ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गोवा क्रिकेट असोसिएशन संघाने पहिल्या डावात ४१३ धावांची मोठी मजल मारली. अभिनव तेजरानाने १०९ धावांची खेळी केली. मंथन खुटकरने ६९ धावांची खेळी केली तर अर्जुन तेंडुलकरने १८ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – IND vs BAN: “अन्यथा भारताचीही पाकिस्तानसारखी स्थिती होऊ शकते…”, सुनील गावसकरांचा मालिकेपूर्वी टीम इंडियाला इशारा

दुसऱ्या डावात अर्जुन तेंडुलकरने पुन्हा आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी खेळाडूने गुढघे टेकायला भाग पाडले. यावेळी केएससीए इलेव्हन संघ अवघ्या १२१ धावांत गारद झाला आणि यावेळीही अर्जुनने मोलाची भूमिका बजावली.. अर्जुनने दुसऱ्या डावात ५५ धावांत ४ विकेट घेतले. यासह अर्जुनने एकूण ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्जुनने त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun tendulkar video 9 wickets took for goa cricket association s ksca xi in k thimmappiah memorial tournament bdg