Arjun Tendulkar’s Insta Story Showing Shirtless Six Packs Goes Viral : एक काळ असा होता, जेव्हा भारतीय क्रिकेटपटूंसाठी फिटनेस ही समस्या होती, परंतु आता काळ बदलला आहे. या गोष्टीचे बरेच श्रेय भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला जाते. सध्या भारतीय संघ फिटनेसच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. विराट कोहलीने भारतीय ड्रेसिंग रुममधील संस्कृती बदलली आहे,. कोहलीची प्रेरणा घेऊन युवा अर्जुन तेंडुलकरनेही फिटनेस गांभीर्याने घेतला आहे. नुकतेच अर्जुनने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तुम्ही त्याचे सिक्स-पॅक ॲब्स फ्लॉंट करताना पाहू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२३ नंतर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात दिसला नसला, तरी तो प्रसिद्धीच्या झोतात राहतो. त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक शर्टलेस सेल्फी शेअर केला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अर्जुन त्याचे सिक्स पॅक ॲब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. यावरून तो फिटनेसबाबत किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. अर्जुनचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

अर्जुन तेंडुलकरने यंदा मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याला चार सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले. एका सामन्यादरम्यान डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केल्याबद्दल अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून ड्रेसिंग रूम प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांनी त्याला हा विशेष पुरस्कार दिला होता.

हेही वाचा – ODI World Cup 2023: विश्वचषकासाठी धर्मशाळा क्रिकेट स्टेडियम सज्ज! नूतनीकरणानंतरचा VIDEO व्हायरल

कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीने केवळ टीम इंडियातच नाही, तर भारतीय क्रिकेटमध्येही फिटनेस पातळी उंचावण्याचे काम केले. कोहलीला पाहून क्रिकेटर्स त्यांच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहेत. यामध्ये केएल राहुल, शुबमन गिल आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश आहे. जे खूप फिट आहेत. आता अर्जुनही याच मार्गावर जाताना दिसत आहे. अर्जुनने शेअर केलेल्या मिरर सेल्फीमध्ये तो पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे.

अर्जुन तेंडुलकर सध्या देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागीय संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी तो गोव्याकडून रणजी करंडक खेळला होता. मात्र, या मोसमात गोव्याने जाहीर केलेल्या रणजी संभाव्य खेळाडूंच्या यादीत अर्जुनचे नाव नाही. अशा स्थितीत तो गोवा संघ सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun tendulkars insta story showing shirtless six packs goes viral vbm