सेनादलाने संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद राखले. त्यांनी चुरशीने झालेल्या अंतिम लढतीत यजमान केरळला टायब्रेकरद्वारा ४-३ असे हरविले. पूर्ण वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता.
जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर ३५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या लढतीत पूर्ण वेळेत दोन्ही संघांनी जोरदार चाली केल्या, मात्र गोल करण्यात दोन्ही संघांचे खेळाडू अपयशी ठरले. टायब्रेकरमध्ये सेनादलाकडून धनाजीसिंग, शर्वणकुमार, एम.दिलीप व किरण व्हर्गीस यांनी गोल केले. केरळकडून रिन्हो अन्तो, अब्दुल बासिद व बी.टी.शरद यांनी गोल केले. सेनादलाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.

Story img Loader