बलाढय़ बायर्न म्युनिचने सुरेख कामगिरी करत इंग्लिश प्रीमिअर लीगमधील अर्सेनल संघाचा ३-१ असा धुव्वा उडवत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.
बायर्न म्युनिचने अंतिम १६ जणांच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात मध्यंतरालाच २-० अशी आघाडी घेतली होती. टोनी क्रूस आणि थॉमस म्युलर यांनी बायर्नला ही आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अर्सेनलच्या लुकास पोडोलस्की याने गोल करत सामन्यात रंगत आणली. पण ७७व्या मिनिटाला मारियो मान्झुकिकने केलेल्या गोलाच्या बळावर बायर्न म्युनिचने हा सामना ३-१ असा जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा