लुकास पोडोलस्कीच्या दुहेरी धमाक्यामुळे अर्सेनलने शनिवारी इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. अर्सेनलने फुलहॅमचे आव्हान ३-१ असे सहज परतवून लावत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
पोडोलक्सीचे दोन गोल आणि ऑलिव्हियर गिरोड याच्या एक गोलमुळे अर्सेनलने सहज विजयाची नोंद केली. डॅरेन ब्रेन्टने ७७व्या मिनिटाला गोल करून फुलहॅमची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत बराच उशिर झाला होता.
दरम्यान, स्टोक सिटीने चार्ली अ‍ॅडम आणि रायन शॉक्रॉस यांच्या गोलांच्या बळावर क्रिस्टल पॅलेस संघावर २-१ अशी मात केली. साउदम्प्टन आणि संडरलँड यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. संडरलँडकडून एमान्युएल गियाचेरिनी याने तिसऱ्या मिनिटाला गोल केल्यानंतर जोस फोन्टेने ८८व्या मिनिटाला साउदम्प्टनला बरोबरी साधून दिली. न्यूकॅसल आणि वेस्ट हॅम युनायटेड तसेच एव्हरटन आणि वेस्ट ब्रूमविच अल्बियान यांच्यातील लढती गोलशून्य बरोबरीत सुटल्या. हल सिटीने नॉर्विच सिटीवर १-० अशी मात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा