ऑलिव्हियर गिरौड याने २२ व्या आणि ८६ व्या मिनिटाला केलेल्या दोन गोलांच्या बळावर अर्सेनलने साऊदम्प्टनचा २-० असा पराभव केला. या विजयासह अर्सेनलने २८ गुणांसह इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. लिव्हरपूल आणि एव्हरटन यांच्यातील सामना ३-३ अशा बरोबरीत सुटल्यामुळे लिव्हरपूलला २४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चेल्सीने वेस्ट हॅम युनायटेडवर ३-० अशी सहज मात करीत २४ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. फ्रँक लॅम्पार्डचे दोन गोल आणि ऑस्करने केलेल्या एका गोलाच्या जोरावर चेल्सीने विजय मिळवला.

Story img Loader